डॉ. जयंत विष्णू नारळीकर

jayant narlikar जन्म – १९ जुलै १९३८, पुणे
शिक्षण – बी.एस्सी (बनारस), बी.ए. (केंब्रिज), पी.एच्.डी. (केंब्रिज), एम्.ए. (केंब्रिज), डी.एस्.सी (केंब्रिज)
सध्याचा पत्ता – संचालक, आयुका पोस्ट बॅग ४, गणेशखिंड, पुणे ४११००७.
फोन – ९५-२०-५६५१४१४(घर,कार्यालय),
फॅक्स – ९५-२०-५६५६४१७
ईमेल – jvn@iucaa.ern

नोकरी / पदे
बेरी रॅम्से फेलो, केंब्रिज
वरिष्ठ संशोधन फेलो, केंब्रिज
व्याख्याता – सैध्दांतिक खगोल विज्ञान, केंब्रिज
प्राध्यापक, टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबई
संचालक, आयुका, पुणे

विशेष कामे
जगातल्या अनेक विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक
सैध्दांतिक भौतिकी व खगोल विज्ञानात अनेक पुस्तके
मराठी ,हिंदी, इंग्रजीत विज्ञान कथा, पुस्तके, कादंबरी लेखन
आकाशाशी जडले नाते हे मराठी/इंग्रजी पुस्तक
सामान्य व्यक्तीलाही समजेल असे लेख, भाषणे
आकाशवाणीवर, दूरदर्शनवर कार्यक्रम
पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार
मराठी विज्ञान परिषदेचे व संमेलनाचे अध्यक्ष

पुरस्कार
पद्मभूषण
युनेस्कोचा कलिंग पुरस्कार
जगातल्या व भारतातल्या अनेक विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट
पुस्तकांना राज्य, राष्ट्रीयस्तरावर बक्षीसे
ऍडम्स, भटनागर, जवाहरलाल नेहरू, गोदावरी, राष्ट्रभूषण,पुण्यभूषण,शाहू, बीबीव्ही (स्पेन) पुरस्कार.

संशोधन
एखादी वस्तू हलकी असते किंवा जड असते. ते तिच्या वस्तूमानावर अवलंबून असते. जड वस्तू उचलायला किंवा ढकलायला त्रास पडतो. जास्त बळ वापरावे लागते. प्रत्येक वस्तूमध्ये ही जडता असते. ही कोठून येते याबाबत विचार करता असे दिसते की न्यूटनच्या मते ही जडता अंगभूत असते. मार्कने मात्र यासंबंधी थोडा वेगळा नियम सांगितला. १९६४ साली नारळीकरांनी या बाबत संशोधन केले. दोन भिन्न मतप्रणालींचा समन्वय त्यांनी गुरुत्वाकर्षणाने दाखवला. मार्कच्या नियमाचे त्यांनी गणित मांडले. त्यातून गुरुत्वाकर्षणाचा वेगळा सिध्दांत मिळाला. आईन्स्टाइनचा सिध्दांत एका विशिष्ट परिस्थितीतच लागू पडतो. आकाशगंगेच्या बाहेर काही ऊर्जेचे स्त्रोत आहेत. तेथे आईन्स्टाइन्चा नियम लावताना काही उणीवा दिसतात. पण त्या ठिकाणी नारळीकरांचा सिध्दांत लागू पडतो. नारळीकरांनी कृष्णविवराच्या निर्मितीविषयीसुध्दा सखोल अभ्यास केलेला आहे. गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीकडे वस्तू खेचली जाते. आपण एखादा चेंडू इतका उंच फेकला की तो परत खाली आलाच नाही असे कधी होईल का, याचा विचार केला तर उत्तर होकारार्थी मिळते. एका सेकंदाला साडेबारा किलोमीटर या वेगाने जर वस्तू फेकली तर ती पृथ्वीकडे खेचली जाणार नाही. अंतराळ याने याच नियमानुसार पृथ्वीबाहेर गेली आहेत. जर पृथ्वीला दाबत दाबत लहान केले तर गुरुत्वाकर्षण वाढत जाईल. पृथ्वीचा व्यास निम्मा केला तर पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षण चौपट होईल. वस्तूचे वजनही चौपट होईल. वस्तू पृथ्वीपासून जास्त दूर जाऊ शकणार नाही. जर पृथ्वी इतकी लहान केली की प्रकाशसुध्दा वजनदार होईल व तोसुध्दा दूर जाणार नाही तर पृथ्वीचा व्यास पाऊण सें.मी. इतका झालेला असेल. प्रकाश दूर जाऊ शकणार नाही म्हणजेच कृष्णविवर होईल. अर्थात हे कधीच शक्य नाही. पण काही ता-यांचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की ते ता-याला लहान करत करत त्याचे कृष्णविवर होऊ शकते.