पहिली बाजू
बालक रूपे जन्म घेतला – मधुरा दातार
यती वेषाने उभे राहिले – आनंद कुलकर्णी
यती वेष दंडधारी – आनंद कुलकर्णी
देवा, चरण तुझे पाहिले – मधुरा दातार
धन्य धन्य हो जगद्गुरू – सचिन करंबेळकर
दुसरी बाजू
गेले विझुनी दीप – मधुरा दातार
श्री गुरूदेव मी पाहिला – आनंद कुलकर्णी
जगी ही अगाध गुरूलीला – सचिन करंबेळकर
भक्तासाठी घेतलेस – आनंद कुलकर्णी
आरती – अर्पितो माला पुष्पांची – सचिन करंबेळक
सुप्रसिध्द कवी, गीतकार व लेखक श्री. अशोक बा. दातार रचित भगवान् श्री. दत्त वरील गीते ‘दत्त वंदना’ या कॅसेट मध्ये समाविष्ट आहेत. ही कॅसेट नुकतीच दिनांक १३ जूलै, २००३ गुरूपौर्णिमेला प्रकाशित झाली.
या कॅसेटमध्ये दहा गीते आहेत. अतिशय प्रासादिक व अर्थपूर्ण गीते, तसेच शास्त्रशुध्द व माहितीपूर्ण लिहीलेले निवेदन व त्याला लाभलेली सुरेल संगीताची साथ श्रोत्याला मोहित करते. श्री गुरूचरित्रातील वर्णनाप्रमाणे व त्यातील वैशिष्टयपूर्ण व महत्त्वांच्या पैलूंवर प्रकाश टाकणारी माहिती/वर्णन शब्दबध्द केले असल्यामुळे गुरूचरित्र सारांशरूपात वाचल्याचा/ऐकल्याचा आनंद श्रोत्याला मिळतो. असे हे दत्तात्रेय म्हणजे गुरूकल्पनेचे परमोच्च स्वरूप आहे. हेच सूत्र या दहा गीतांतून प्रतीत होते. व हेच या गीतांचे मोठे यश आहे. श्री. अविनाश पटवर्धन या मुळात संगीत शिक्षक असलेल्या तरूण संगीतकाराची सुरेल स्वरसाज या गीतांना लाभला आहे. तसेच आजचे आघाडीचे तरूण गायक – श्री सचिन करंबेळकर, श्री. आनंद कुलकर्णी तसेच गायिका कु. मधुरा दातार यांचा सुरेल व सुमधूर आवाज या गीतांना लाभला आहे. कॅसेटमधील सुरवातीचे निवेदन श्री. मंगेश दिवाणजी या प्रसिध्द कलाकाराच्या भारदस्त आवाजात ऐकायला मिळते. भक्ती संगीतासाठीची पारंपारिक वाद्ये साथीला घेतली आहेत-
या कॅसेटची निर्मिती ‘सनराज म्यूझिक हाऊस’ तळेगांव-पूणे तर्फे श्री. सुनील राजवाडे ह्यांनी केली आहे. ह्या कॅसेटच्या परिपूर्ण व बिनचूक निर्मितीसाठी श्री. सुनील राजवाडे व संगीतकार श्री. अविनाश पटवर्धन ह्यांनी खूप परिश्रम घेतल्याचे कॅसेट ऐकताना जाणवते. कॅसेटची किंमत माफक म्हणजे फक्त रू. पस्तीस आहे.
प्रत्येक मराठी माणसाने व दत्तभक्ताने ही कॅसेट संग्रही ठेवावी इतकी सर्वांगाने व सर्वांर्थाने अनमोल आहे.
पुस्तक – दत्तवंदना कॅसेट
संपर्क – पल्लवी कुलकर्णी
किंमत – रु.३५/-
टिप – ग्राहकांना कुरियरचा खर्च वेगळा द्यावा लागेल.