सध्या कार्टून नेटवर्कवर आपल्याला भेटणारी ‘मेडेलाइन’ ही आठ वर्षांची आपली मैत्रिण खरं खूप मोठी आहे बरं का ! किती माहितीये ? मेडेलाइनची पुस्तक ऑस्ट्रियन लेखक लुडवीग बेमेलमॅननी १९३९ साली पहिल्यांदा लिहिली. पुस्तक खूपच लोकप्रिय झाल्यामुळे बेमेलमॅननी १९४०-५० साली सुध्दा लिहीली आणि आतापर्यंत त्यांचा नातू जॉन बेमेलमॅन लिहीत होता. ह्या वरुन मेडेलाइनची मुलांशी जमलेली गट्टी तुमच्या लक्षात येईल.
मेडेलाइन मेडेलाइन ही तिच्या इतर ११ मैत्रिणीं आणि बाईंसोबत पॅरिस मध्ये राहणारी छोटी मुलगी आहे. ह्या बाराजणी कायम सहाच्या रांगेत चालणारया आहेत. मेडेलाइन ही त्यांच्यात सर्वात लहान तरी सर्वात बहादर ! मेडेलाइनकडे आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याची कला आहे. कधी चोरांना पकडणारी, कुत्र्याला वाचवणारी, मैत्रिणींना मदत करणारी, निसर्गात रमणारी मेडेलाइन सर्वांना खुपच आवडणारी आहे. पुस्तकांनंतर मेडेलाइनची टिव्हीवर तर आलीच पण तिच्या फ्रेंच चित्रपटही निघाले आहेत. मेडेलाइनची वेबसाइट आहे
http://www.madeline.com मेडेलाइनचे थीम सॉंग आहे –
In an old house in Paris that was covered with vines,
lived twelve little girls in two straight lines
They left the house, at half past nine …
The smallest one was Madeline.
कार्टूननेटवर्कवर दिसणारा मिर्मो हे खरे जॅपनीज कार्टून आहे. मिर्मो कार्यक्रमाची मुख्य नायिका आहे केटी. एके दिवशी केटीला जादुचा कप सापडतो. कपात चॉकलेट दुध ओतल्यावर, प्रेमाची परी ( पण मुलगा ) प्रगट होतो त्याचे नाव मिर्मो. केटीला तिचा मित्र डायलन युकी खुप मिर्मोआवडत असतो आणि मिर्मोनी त्यांना दोघांना भेटवण्यात मदत करावी असे मिर्मोला वाटत असते. पण होते भलतेच मिर्मोला केटीला मद्त करण्यापेक्षा चॉकलेट खाण्यात आणि मिर्मोला चिडवण्यात जास्त रस असतो. मिर्मोला डायलन कडे असणारी परी रिरुमू खूप आवडत असते. ह्या सगळ्यांमध्ये घडणा-या गमतीजमती म्हणजेच मिर्मोचा प्रत्येक एपिसोड.
मिर्मोला प्रथम २००१ साली जपानच्या ‘शोगाकुकान’ मासिकात कॉमिक मालिकेत सादर केले गेले. अल्पावधीत लोकप्रिय झाल्यामुळे २००२ साली जपान टिव्हीवर सादर करण्यात आले.
मिर्मोला त्यावेळचा चिल्ड्रन ग्रुपचा पुरस्कारही मिळाला होता. तेव्हापासून मिर्मो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.
मिर्मोच्या जपानी भाषेत असलेल्या वेबसाईट बघायला विसरु नका –
http://www.vap.co.jp/mirumo
निक ज्यूनियरवर दाखवला जाणारा ‘लेझी टाऊन’ हा कार्टून शो जरा हटके आहे. ह्या कार्टून शो मध्ये निर्जीव बाहूल्यांबरोबरच सजीव लेझी टाऊनमाणसेही काम करतात. नावाप्रमाणेच लेझी टाऊन हे आळशी लोकांचे शहर आहे. हा कार्यक्रम प्रथम आइसलॅंडमध्ये स्टेजवर दाखवला जायचा. टिव्हीवर दाखवतांना त्यात बरेच बदल केले गेले. त्यात आइसलॅंड आणि अमेरिकन दोंन्ही संस्कृतींचा सामावेश केला गेला.
स्टेफनी ही लेझी टाऊनच्या महापौराची भाची लेझी टाऊन मध्ये काही दिवसांकरिता राहायला येते. लेझी टाऊन मध्ये तिला अनेक गंमतीदार छोटीमोठी पात्र भेटतात. त्यांच्यात घडणा-या गमतीजमती म्हणजेच लेझी टाऊनचा प्रत्येक एपिसोड. लेझी टाऊन मध्ये स्पोर्टेकस हा सुपर हिरो आहे तर रॉबी रॉटन सुपर व्हीलन. त्यांच्या बरोबरीने स्टींगी, पिक्सेल, मेयर, बिझी, ट्रिक्सी, झिगी ही पात्र आहेतच. नाचाची आवड असणारी स्टेफनी लेझी टाऊनच्या रहिवाशांना वेळोवेळी कामाचे महत्त्व पटवून देते. तुम्हा मुलांसाठी सुध्दा लेझी टाऊनच्या लोकांकडून शिकण्यासारखे बरेच आहे. लेझी टाऊनची वेबसाईट http://www.lazytown.com जरुर पहा.
निक ज्यूनियरवर भेटणारा लुनार जिम बालवर्गातल्या दोस्तांना आकाशगंगेची सफर घडवून आणतो. जिम, त्याचा कुत्रा रोवर, इंजिनिअर लुनार जिमरिप्पल, एको शेतकरी, डेझी गाय आणि पिक्सेल संगणक असे सारे मिळून एकत्र एका गावात रहात असतात. त्यांचे गाव कुठे असते माहिती आहे ? अहो, चक्क चंद्रावर! आहे की नाही थ्रील! त्यामुळे जिमला लुनार जिम म्हटले आहे. जिम आणि त्याचे दोस्त कायम अंतराळवीराच्या वेशात असतात. लुनार जिम हे कार्टून ‘स्टॉप मोशन’ पध्द्तीने तयार केले आहे. म्हणजे बघा एखादी स्थिर असणारी वस्तू हळूहळू चालवायची त्याला म्हणतात स्टॉप मोशन. अलेक्झॅंडर बारने लिहीलेल्या ह्या गोष्टी , कॅनडाच्या हॅलिफेक्स फिल्म कंपनीने प्रथम प्रेक्षकांसमोर सादर केल्या. प्रत्येक गोष्टीं मध्ये सोप्या पध्दतीने विज्ञान सादर केले आहे. त्याच बरोबर गोष्टीं मध्ये कल्पकता, साहस आणि महत्त्वाचा संदेश दडलेला आहे. तर मग शाळेतले विज्ञान शिकायचे असेल तर ”गेट लुनार”.