विविध खेळ

क्रिकेट

cricket स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.

भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. ‘रणजी ट्रॉफी’, ‘दिलीप करंडक’ व ‘इराणी ट्रॉफी’ हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.

क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत
क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.

क्रिकेटची साधने व पटांगण
चेंडू – वजन १५५ ग्रॅम्स, परिघ २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी – ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट – रूंदी – ११ सेंमी, लांबी – ९५ सें. मी.

विकेटस् – तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.

पिच् – दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.

खेळाची सुरूवात
cricket क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.

फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. ‘प्ले’ असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.

ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.

हॉकी

Hockey हॉकीचे मैदान १०० यार्ड (९० मीटर्स) लांब आणि ६० यार्डस् (५५ मीटर्स) रुंद असते. हॉकीसाठी वापरल्या जाणा-या बॉलचं वजन १५६ ग्रॅम्स ते १६३ ग्रॅम्स इतकं असतं. बॉलचा व्यास ८.८१ इंच ते ९.२५ इंच इतका असतो. हॉकी स्टीक डाव्या बाजूने सपाट असते आणि वजन साधारणपणे १२ ते २८ पाउंडस् इतकं असतं. हॉकीचा गेम सुरू करण्यापूर्वी दोन्ही संघातील एक एक खेळडू आपापली हॉकी स्टीक जमिनीवर व एकमेकांच्या हॉकीस्टीकवर आदळतात. आणि खेळ सुरू होतो. मैदानाच्या रुंदीकडील भागाला जोडणा-या रेषेला ‘गोल लाईन’ म्हणतात. संपूर्ण मैदानाचे दोन समान भाग करणाऱ्या आणि गोल लाईनला समांतर जाणा-या मध्यभागातील रेषेला फिफ्टी यार्ड-लाईन किंवा सेंटर लाईन म्हणतात. खेळ पुन्हा सुरू करण्यासाठी खेळाडू त्याच्या टीमच्या दिशेने बॉल फेकतो. या कृतीला पास बॅक म्हणतात. या शिवाय कॅरी, कॉर्नर, ड्रिबल, हॅट-ट्रीक, साइड लाईन, स्ट्रायकिंग, सर्कल या संज्ञा हॉकीशी संबंधित आहेत.
राष्ट्रीय स्तरावर इंडिया इंदिरा गांधी गोल्ड कप, गंगोत्रीदेवी वुमन्स हॉकी फेडरेशन कप, रंगास्वामी कप, बॉम्बे गोल्ड कप, नेहरु गोल्ड कप असे अनेक पुरस्कार हॉकीसाठी दिले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड कप, युरोपियन वुमन्स हॉकी कप, इंदिरा गांधी गोल्ड कप, चॅम्पियन हॉकी आणि अन्य पुरस्कार दिले जातात.

साधारणपणे इसवी सनपूर्व २००० च्या दरम्यान पर्सियामध्ये हॉकी खेळाची सुरुवात झाली. प्राचीन काळी ग्रीक लोक हा खेळ खेळत असत, असा इतिहासात उल्लेख आहे. ‘ब्लॅक हेथ’ नावाने पहिला हॉकी क्लब स्थापन करण्यात आला. या खेळाचे नियम सुरवातीला विंबल्डन हॉकी क्लबतर्फे व त्यानंतर १८८६ साली हॉकी असोसिएशन तर्फे तयार केले गेले. पहिला आंतरराष्ट्रीय हॉकी सामना १८९५ साली इंग्लंड आणि आयर्लंड या दोन देशांदरम्यान खेळला गेला. १९०८ साली ऑलिम्पिक मध्ये पहिल्यांदा हॉकीचा सामना खेळला गेला.

संकलन – शितल जाखडी