आपले मूल अभ्यासात त्याच्या वर्गात सरस असावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. विषयाचे आकलन होणे, विषय समजावून घेणे आणि परिक्षेत आत्मविश्वासाने सादर करणे ह्या प्रक्रीयेतून प्रत्येक विद्यार्थी जात असतो. बरेचदा विषयाचे नीट आकलन न झाल्यामुळे पाठांतरावर भर दिला जातो त्यामुळे अपयशाची शक्यता वाढते. अभ्यासाचे तंत्र शिकून घेतल्यास ही अडचण येत नाही. नेटवर अगदी वर्गानुसार नसला तरी आपल्याला विषय आणि उपविषय समजून घेता येतात.
भाषा विकासाचा विचार करायचा झाल्यास तो अगदी जन्मापासून सुरु होतो. सर्वसाधारण समज आहे की बाळाचे भाषिक ज्ञान शाळेत गेल्यावर सुरु होते परंतु हे खरे नाही. जन्मापासून त्याचे पालक आणि नातेवाईक जेव्हा बाळाशी बोलतात, संवाद साधतात, खेळतात, चित्र काढायला शिकवतात, तेव्हापासूनच ‘ब्रेन स्टीम्यूलेशन’ चालू होते. आपली मातृभाषा किंवा व्यवहारीक भाषा (इंग्रजी) मुलांना शिकवायची असल्यास मुलांनी ती जास्तीजास्त भाषा ऐकणे, संवाद साधणे, भाषा बोलतांना येणा-या अडचणी समजावून घेणे, शब्दखेळ, वाचन, कथाकथन, नाटकं, कविता, त्या भाषेच्या सवंगडयांबरोबर जास्त वेळ घालवणे इत्यादी उपक्रम राबवण्यास पालकांनी जास्तीजास्त सहभागी व्हावे. त्या विषयी आपल्याला http://www.hellofriend.org/parents/language.html, http://www.sil.org/lglearning/developing.htm ह्या लिंकवर कुठलीही भाषा शिकण्याच्या खालिल पाय-या दिल्या आहेत – भाषेतल्या शब्दांचा उच्चार योगरित्या करा, शुध्द व्याकरण वापरा, शब्दसंपदा वाढवा, मोठया वाक्यांची रचना करायला शिका, तुम्हाला काय सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगायचा प्रयत्न करा, वेगवेगळ्या प्रसंगी योग्य शब्द आणि वाक्यांचा वापर करायला शिका, इतर लोकांबरोबर त्याच भाषेत संवाद साधा… अश्या अनेक टिप्सचे सखोलपणे लेख आपल्याला वाचायला मिळतात.
सहाव्या वर्षापर्यंत मुलांची ग्रहण क्षमता खूपच अफाट असते. त्यामुळे त्यांचे वाचन ह्याच वेळेला सुरु करावे, असे डॉ. मारिया मॉंटेसरी ह्यांचे म्हणणे आहे. भाषेतले शब्द शिकण्यासाठी दोन पध्दती आहेत. परंतु त्यावर प्रत्येक संशोधकाचे वेगवेगळे मत आहे. पहिल्या पध्दतीत प्रत्येक अक्षर आणि त्याचे उच्चार (फोनोग्राम्स) शिकवणे आणि मग त्याची जोडणी करणे तर दुस-या पध्दतीत संपूर्ण शब्दच शिकवणे ह्यामध्ये प्रत्येक शब्दाचा उच्चार (फोनोग्राम्स) अपेक्षित नसतो. ह्या दोन्ही पध्दतींना अनुसरुन पुढे भाषा शिकण्यासाठी फोनोग्राम्स (किंवा फोनिक्स) आणि फ्लॅशकार्डचा वापर केला जातो. समजा इंग्रजीत cat शिकवायचे असेल तर फोनोग्राम्स नुसार क, ऍ, ट अशी फोड करुन शिकवावा लागतो.
http://www.internationalparentingassociation.org ह्या साईट्वर प्रसिध्द मेंदू संशोधक डॉ. ग्लेन डोमन ह्यांनी फ्लॅशकार्डसची पध्दत अत्यंत परिणामकारक असून बोलायच्या वयातच मुलं फ्लॅशकार्डसच्या सहाय्याने वाचू शकतात हे सिध्द केले आहे. त्यांनी सांगितले की विषयाला अनुसरुन दहा फ्लॅशकार्डस तयार करायचे. जी भाषा आपल्याला शिकवायची आहे त्या भाषेतले समान विषय असणारे शब्द पांढ-या पुठ्ठ्यावर लाल रंगात लिहायचे. आता हा दहा फ्लॅशकार्डसचा संच मूलासमोर धरुन, प्रत्येक शब्द त्याला व्यवस्थित दाखवून मोठ्या आवाजात शब्द उच्चारायचा. असे साधारण दिवसातून दोन तीन वेळा करावे. मात्र मूल कंटाळले असल्यास लगेचच थांबावे. अश्या पध्दतीने मूल शब्द ओळखायला लागल्यावर पुन्हा नवीन विषयाचा संच तयार करावा.
फ्लॅशकार्डसच्या सहाय्याने गणितही शिकवता येते. एक ते दहा अंक असणा-या मोठया लाल टिकल्या किंवा काळ्या रंगात चांदण्या पांढ-या पुठ्ठ्यावर काढाव्यात. गणिताचे हे फ्लॅशकार्डस वरील प्रमाणे मुलांना दाखवण्यात यावे. अश्या प्रकारे मुलं शंभरपर्यंत अंक सहजपणे शिकतात.
नेटवर मुख्यता इंग्रजी विषयाचे फ्लॅशकार्डस पुढील साईट्स वरुन प्रिंट करुन आपल्याला वापरता येतील
http://www.britishcouncil.org/kids-flashcards.htm,
www.flashcardexchange.com,
www.eslflashcards.com,
http://www.mes-english.com
इंग्रजी विषयी न्यूनता कमी होऊन आत्मविश्वास वाढावा ह्यासाठी खास शिक्षक आणि पालकांना साईट्सवरची कोडी, शब्दांची उलटापालट, रिकाम्या जागा, चित्र ओळख, शब्द शोधा, शब्द ओळखा, चित्र वर्णन वगैरे सारखा व्यवसाय प्रिंट करुन मुलांना सोडवायला देता येऊ शकतो. ब-याच साईट्सवर हे शब्दखेळ फक्त ऑनलाईन खेळायची सोय असते. प्रत्येक वेळेला मुलांना ऑनलाईन ‘ऍक्सेस’ देणे शक्य नसते त्यामुळे वेगळ्या फाईल मध्ये हा मजकूर सेव्ह करुन प्रिंट करावा. काही साईटसवर कमी अधिक प्रमाणात हे शब्दखेळ मोफत उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी साईटचे सभासदत्व स्विकारता येते. परंतु बहुतांशी साईट्स अमेरिकन असल्यामुळे किंमत डॉलर्स मध्ये असते. त्यामुळे कुठल्याही एकाच साईटवर अवलंबून न राहता आपले सर्चिंग अधिक व्यापक करणे हेच योग्य. इंग्रजी वगळता इतर भारतीय भाषांमध्ये अश्या प्रकराचे खेळ फारसे उपलब्ध नाहीत.
http://www.bbc.co.uk/schools/wordsandpictures/cvc/print/index.shtml ,
http://www.tlsbooks.com ह्या साईटवर ग्रेड (वर्गानुसार) इंग्रजी आणि गणिता करीता विविध वर्कशीट्स दिलेली आहेत. आपल्याला हव्या असलेल्या वर्कशीटवर क्लिक केल्यास स्वतंत्र पिडीएफ (PDF) फाईल उघडते त्यामुळे आपल्याला सहजपणे त्याचे प्रिंट घेता येते किंवा पुर्नवापरासाठी सेव्ह करुन ठेवता येते. http://www.schoolexpress.com ह्या साईटवर आपल्याला हवे तसे unscrambble the words, build vocabulary, find missing words सारखे शब्दखेळ आणि गणिताचे खेळ ऑनलाईन सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करता येतात. http://www.abcteach.com/index.html ह्या साईटवर विषयानुसार विविध प्रश्न तर आहेतच परंतु गोष्टीरुप परिच्छेद (comprehension) वाचनासाठी उपलब्ध असून त्यावर प्रश्न विचारले आहेत. http://www.englishbanana.com/big-grammar-book-english-worksheets.html ह्या लिंकवर इंग्रजी व्याकरणाचे शंभर पानी पुस्तक डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे. वर्गानुसार व्याकरणाचे विविध प्रश्न येथे सोडवता येतात आणि उत्तरेही डाऊनलोड करुन घेता येतात.
इंग्रजी प्रमाणेच शालेय गणित विशेषता प्राथमिक गणिताचे व्यवसाय (exercises) भरपूर सोडवता येतील अश्या ब-याच साईट्स आहेत. http://themathworksheetsite.com ह्या साईटवर साध्या गुणाकार, भागाकारापासून ते मापन मोजणी पर्यंत अनेक गणित व्यवसाय सोडविण्यासाठी आहेत. विशेष म्हणजे हे गणिताचे व्यवसाय दिलेले आकडे निवडून आपल्याला गणित तयार करता येते. त्यामुळे शिक्षक आणि पालक आकडयांची विविध कॉंबिनेशन्स करुन गणिते तयार करु शकतात. ह्या साईटच्या ब्लॉगवरही कोडी, खेळ आणि गणिताच्या युक्त्या अत्यंत वाचनीय आहे. www.ilovemaths.com ही साईट ६वी ते १२वीच्या सिबीएसी, आयसीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. प्रत्येक वर्गासाठी उजळणी तर आहेच पण त्याच बरोबर गणिताची रंजक कोडी आणि विनोद देखिल आहेत.
http://www.happychild.org.uk/wks/math,
http://www.funmaths.com/worksheets/index.htm
ह्या साईटवर माध्यमिक विद्यार्थांकरीता अनेक गणिते सोडविण्यासाठी दिलेली आहेत.
आपल्या पाठयक्रमाव्यतिरिक्त नेटवरच्या साईटसवरुन पालक आणि विद्यार्थ्यांसाठी भरपूर वाचनासाठी आणि सोडविण्यासाठी आहे. इंग्रजीत असले तरी सर्व शाळा त्याच्या उपयोग करुन घेतील अशी खात्री आहे.
– भाग्यश्री केंगे