साहित्य – लोणी किंवा मार्गरिन २५० ग्रॅम, मैदा ५०० ग्रॅम, बेकींग पावडर १ टेस्पून, ब्राऊन शुगर २५० ग्रॅम, खोब-याचा बारीक कीस २०० ग्रॅम, अंडी २, गोड ताक किंवा दूध १/२ कप.
कृती -१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून झाकून ठेवावे.
३) मार्गरिन किंवा लोण्याचे तुकडे करून ते मैद्यात मिसळावे. मिसळताना फक्त बोटांची टोकेच वापरावी. मिसळून झाल्यावर ब्रेडच्या भुग्याप्रमाणे दिसले पाहिजे.
४) त्यात हलक्या हाताने साखर व खोबरे मिसळावे.
५) अंडी फोडून घुसळून त्यात मिसळावी.
६) त्यात ताक किंवा दूध घालून सारखे करावे.
७) केकच्या टीनला तळाला व बाजूला लोणी लावून त्यात मध्यभागी बटरपेपरचा तुकडा लावावा.त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूनी लागला पाहिजे.
८) तयार मिश्रण टीनमध्ये घालून तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये १८-२० मिनीटे भाजावे.
९) केकच्या मध्यभागी सुरी घालून केक तयार झाला आहे का ते पहावे. केकचे मिश्रण सुरीला न चिकटल्यास केक तयार झाला असे समजावे.
१०) केक जाळीवर काढून थंड होऊ द्यावा.
– आदिती पातकर
साहित्य – अंडी ४ (वजन अंदाजे २०० ग्रॅम), मैदा २५० ग्रॅम, बेकींग पावडर १ सपाट टीस्पून,साखर २५० ग्रॅम, मार्गरिन १८० ग्रॅम, दूध ३ टेबलस्पून, व्हॅनिला इसेन्स १ टीस्पून, कोको पावडर ३ टीस्पून किंवा इंस्टंट कॉफी पावडर ३ टीस्पून, कोणत्याही चवीचा जॅम ३ चमचे.
कृती – १) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) केकच्या टीनला तळाला व बाजूने मार्गरिन लावून मध्यभागी एक बटरपेपरचा छोटा चौकोनी तुकडा लावावा.नंतर टीनमध्ये मैदा भुरभुरावा.मैदा टीनला सर्व बाजूने लागेल असे पहावे. ह्या केकसाठी २ टीन आवश्यक आहेत.
३) मैदा, बेकींग पावडर व मीठ एकत्र करुन तीनदा चाळून घ्यावा.
४) अंडी, मार्गरिन व साखर ह डमिक्सर किंवा इलेक्ट्रीक बीटर किंवा मिक्सर वापरुन साधारणपणे साखर विरघळेपर्यंत फेटावे. त्यात व्हॅनिला इसेन्स घालावा.
५) ह्या मिश्रणात चाळून घेतलेला मैदा, बेकिंग पावडर हळूहळू घालत एका दिशेने गोलाकार मिश्रण फेटावे म्हणजे गुठळया होणार नाहीत. मैदा घातल्यानंतर मिक्सर वापरू नये. हाताने लाकडी किंवा प्लॅस्टीकचा चमचा वापरून मिश्रण फेटावे.
६) अर्धे मिश्रण एका टीनमध्ये घालावे.
७) उरलेल्या मिश्रणावर कोको पावडर किंवा कॉफी चाळणीने शिंपडावी. नंतर चमच्याने सारखी ढवळावी.मग ते मिश्रण दुस-या टीनमध्ये घालावे.
८) तापलेल्या ओव्हनमध्ये हे दोन्ही केक्स भाजून घ्यावेत.
९) साधारण २० मिनीटानी सुरी किंवा विणकामाच्या सुई केकमध्ये घातली असता ती स्वच्छ बाहेर आली म्हणचे केक तयार झाला असे समजावे.
१०) केक तयार झाल्यावर सर्व बाजूनी सुरी फिरवून कडा सोडवून ध्याव्यात. तारेच्या जाळीवर टीन उपडा करावा. केक थंड होऊ द्यावा.
११) कोणताही आवडीचा जॅम एका वाटीत घेउन मंद आचेवर गरम करावा. गरम असतानाच एका केकवर सुरीने पसरावा व दुसरा केक त्यावर हलक्या हाताने दाबून चिकटवावा.
१२) नंतर त्याचे तुकडे कापावेत.
१३) दोन वेगवेगळया रंगांमुळे हा केक छान दिसतो. एकाच केकमध्ये दोन वेगवेगळे स्वाद असल्याने आयसिंगची आवश्यकता नाही.
– आदिती पातकर