निसर्गाचं शहाणपण

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

प्रत्येक माणसाची आपली अशी एक खास आवडती जागा असते. घराचा एखादा कोपरा, एखादी खोली. ति थेनक्की काय जादूअसते माहि ती नाही, पण सगळ्या गोष्टी ति थेअगदी मनासारख्या जुळून येतात. माझ्या अगंणात उभ्या असलेल्या औदंबुराचे माझ्या गच्चीवर पसरलेले छत ही अशीच माझी एक अत्यंत आवडती जागा. का कुणास ठाऊक, गच्चीचा तो कोपरा, ति थली खुर्ची , टेबल आणि मी असंएक वेगळंच भाववि श्व तयार झालंय. रोजची वेगळी सकाळ, उत्तरायण ते दक्षि णायन सूर्या च्या स्थि तीत प्रत्येक दिवशी होणारा बदल, समोरच्या झाडांची जागोजागी दि सूलागलेली कोवळी ताजी पालवी, कोसळणारा पाऊस, थेट हि मालयावरून वाहणारा गार, बोचरा वारा, तर कधी दूरची झाडेच काय तर समोरची घरेही दि सूनयेत एवढंधुकं – सगळं कसंनजरेत साठवून ठेवलंय मी त्या जागेवरून. ह्या बरोबरच एक छानशी गोष्ट माझ्या लक्षात आली व ती म्हणजे
माझ्या सारखीच पक्षांची पण एक आवडती जागा असते. ति थेबसून तेकाही काळ आजूबाजूचा परि सर न्याहाळतात, इतर पक्षांशी संवाद करतात. अगदी जसा आनंद मला माझ्या त्या जागेवर येऊन मिळतो तसाच त्यांनाही मिळत असावा म्हणून ते वारंवार तिथे येतात. आणि त्यांची ती आवडती जागा म्हणजे गच्चीच्या एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या बाबंचू े वरचे टोक! बलु बलु , दयाळ, कबुतर, वटवट्या, टकाचोर, मैना, कबुतर सगळ्यांचीच इथे बसण्यासाठीची धडपड. वेगवेगळ्या भावावस्थेमध्ये या विविध पक्षांना बघण्याची संधी मला माझ्या आवडत्या कोपऱ्याने दिली आहे. त्यांच्या रंगीबेरंगी पिसांचं सौंदर्य डोळेभरून पाहण्याची, त्यांच्या किलबिलटाचा, चिवचिवाटाचा अर्थ शोधून काढण्याची.

माझ्या ह्या कोपऱ्यात बसून पक्षी निरीक्षण करताना मी अनेक गोष्टींची नोंद करून ठेवली. माझ्या निरीक्षणानुसार प्रत्येक पक्षाचा आवाज वेगळा असतो, काही पक्षी इतर पक्षांच्या आवाजाची नक्कल करू शकतात. पक्षाचं आकारमान, रंग, आवाज, तो काय करत होता, कधी दिसला, त्याचा आहार, त्याची उडण्याची पद्धत, वागणूक ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करण्यात आणि त्यामुळे पक्षाचा स्वभाव जाणून घेण्यात या निरीक्षणामुळे मला खूपच मदत झाली. एखादा पक्षी बघताक्षणी त्याच्या अंगावरची एखादी महत्वाची खूण, त्याचं ठळक वैशिष्ट्य माझ्या लक्षात येऊ लागलं. त्या उंच बांबूचे वरचे टोक म्हणजे ह्या पक्षांची आवडती जागा हे जसे मला समजले होते, तसेच शेजारच्या झाडांवर अव्याहतपणे कार्यरत असलेल्या खारीलाही ते पक्के समजले होते. ‘काय आहे ह्या टोकावर म्हणून हे पक्षी इथेसारखी ये-जा करतात?’ हा प्रश्न ति लाही पडला होता. उत्तर सापडवण्यासाठी तीही इथे येऊन बसू लागली. एखादया बुरुजावर बसून टेहळणी करतात तेच ती करू लागली. एक कोपरा माझा आणि दुसरा अधून मधून ति चा. तडु तड्ु या शि जिं रनेकंुडीतील एक झाडाच्या आधारानेलोंबतं, टांगतं घरटं बनवलंआहे हे आम्ही दोघींनी आपापल्या कोपऱ्यात बसून बघितलं. थांबणं म्हणजे काय आणि थकणंम्हणजे काय हे दोघांनाही – म्हणजे खारीला आणि शिजिंरला ठाऊक नव्हत.े घरटं बनलं! मग अंडी घातल्यावर त्यांचं संरक्षण, अंड्यातून बाहेर आल्यावर पिल्लांना अन्न पुरवणं! कधी नर कामावर, तर कधी मादी. स्थिर बसून मी आणि खारीने हे लक्षपूर्वक बघितलं. शिक्रा पक्षी इतर छोटेपक्षी, पाली, सरडेयांसारखेप्राणी खाऊन पोट भरतो, तर भारद्वाज इतर पक्षांच्या घरट्यावर हल्ला करून अंडी खातो.

ह्या पैकी कोणीही आमच्या परि सरात आढळला की ही खार “छुक छुटुक” आवाज करत इतर खारींना आणि ह्या शिजिंर जोडप्याला त्यांच्या येण्याची बातमी देई. मलाही अगदी तेच करावंसंवाटायचं. गच्चीत इतर झाडांना पाणी घालत असताना क्षणभर घरट्यासमोर रेंगाळून त्या शिजिंर मादीची वि चारपसू मी करत असे. ही खार पण औदंबुराच्या फांदीवर बसनू आपल्या आवाजात काहीतरी संवाद करत असे. तिच्याही त्या शिजंीरबरोबर गप्पा चालत. पिल्लं मोठी झाली की पालकपक्षी पि ल्लांनी घराच्या बाहेर झेप घ्यावी म्हणून अन्न घेऊन चकरा मारणंहळूहळू कमी करतात. पण ते आजूबाजूच्या झाडावर बसून घरट्यावर लक्ष ठेवतात. त्या दिवशी सकाळी मी बघितले की पिल्लंअगदी घरट्याच्या टोकावर येऊन बसली आहेत. समोरच्या झाडावर बसलेले त्यांचे पालक त्यांनी घरट्याबाहेर झेप घ्यावी म्हणून ति थूनच त्यांच्याशी संभाषण करीत आहेत. तेव्हां मी माझी खुर्ची अशारीतीने लावून घेतली की जि थून मला सगळ्या घडामोडी स्पष्ट दिसतील. आणि आश्चर्य म्हणजेती खार पण औदंबु राच्या फांदीवर बसनू उत्सकुतने ति कडे लक्ष ठेवून होती. दोन पिल्लांपैकी एका पिल्लानेथोड्याच वेळात पहि ली झेप घेतली ती सरळ घरट्यातून गच्चीच्या जमिनीवर. इतका वेळ शांत बसून सगळं पाहत असलेल्या खारीने पण “छुटुक” असा आवाज करून माझ्या सारखाच, “चला, घेतली झेप एकदाची!” असा उसासा सोडला होता कां? आणि दुसऱ्या पिल्लाने पण काही वेळातच शजेारील कंुडीतील झाडावर झपे घेतली. थोड्याच वेळात पालक पक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही पिल्लेऔदंबु राच्या झाडावर विसावली.

शिजंीराने घरटं बांधण्यापासनू त्याची पिल्लं पहिली झपे घेई पर्यंतचा प्रवास मी आणि ती खार बघत होतो. एकमेकांचेवि चार न बोलताही समजू शकत होतो. कि ती नकळत हे सगळं जोडलंगेलं होतं! खारीची आणि माझी गोष्ट सांगण्याच्या मागचा मथि तार्थ हा की “मी बरंआणि माझंघर बरं” ह्या वि चारातून बाहेर पडून निसर्गा त अवतीभवती काय घडत आहे हे बघण्यासाठी मनाची खिडकी उघडली की काहीतरी नवीन सापडतंच! कुतूहलापोटी आपण आपल्या परीने शोधही घेऊ लागतो आणि मग हाती लागतो एक गुप्त खजिना, तो म्हणजे “निसर्गाचं शहाणपण!”

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com