भरारीमागील कष्ट

प्राणी-पक्षी माझे सांगाती मुख्यपान

पक्षी निरीक्षण करताना मला निसर्गा तील सूक्ष्मता बघायला व अनुभवायला मि ळाली. अनेक आश्चर्ये उलगडून बघताना निसर्गा च्या खजि न्याचा शोध लागला. शोध घेणे हा आपला सजगतेच्या भाग आहे. अशा अनेक आश्चर्यां चा पाठपुरावा करताना मी समृद्ध होत गेले.

आजूबाजूला भि रभि रणारी रंगीबेरंगी फुलपाखरे माझे लक्ष वेधून घेत होतीच..आणि मनात वि चार येत होते की ह्या फुलपाखरांशी मैत्री करता येईल का? त्यांना आपल्या बागेत बोलवता येईल का आणि त्यांचेछान छान फोटो काढता येतील का? ह्या कुतूहलापोटी मी त्यांचा थोडा अभ्यास केला. त्यांचा नैसर्गि क अधि वास, त्यांचे जीवनचक्र, त्यांना जगण्यासाठी लागणारे अन्न या विषयी वाचन केले.

माझ्या घराच्या अवतीभवती कडुलि बं , कढीपत्ता, अशोक, सीताफळ, लिबं, कदंब, बहावा अशी अनेक झाडे होती. ही झाडे म्हणजे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या जातींची “होस्ट प्लांटस” म्हणजे “आति थ्य वृक्ष”. त्या वृक्षांचा शोध घेतल्यानंतर फुलपाखरांची मादी त्या वृक्षांच्या पानाखाली अंडी घालते, जेणेकरून ती भक्षक प्राणी-पक्षांना दि सत नाहीत. अंडी काही दि वसांनी आपोआपच उबतात आणि त्यातून अगदी लहान आकाराची अळी बाहेर पडते. ही अळी अति शय खादाड असते, सर्व प्रथम अंड्याचे कवच खाऊन टाकून ती पानांकडे वळते. अधाशी वृत्तीमुळे ति ची वाढ जलद होते. माझ्या आवारातील बहाव्याच्या फुलांचेगुच्छ माझंलक्ष वेधून घेत असत, पण जेव्हा हे झाड “common emigrant” (मराठी नाव – परदेशी/प्रवासी) नावाच्या संदु र पि वळ्या फुलपाखराचा “आति थ्य वृक्ष” आहेहे कळल्यावर त्याचेमी अगदी लक्षपूर्वक नि रीक्षण केले आणि एका सौन्दर्यपूर्ण आणि चि त्तवेधक जीवनचक्राची साक्षीदार झाले.

‘अंडी, त्यातून बाहेर येणाऱ्या खादाड अळ्या, अळ्यांनी वि णलेले कोष आणि मग कोषातून हळुवारपणे बाहेर येणारे फुलपाखरू’ हे त्यांचं जीवनचक्र. अळीची पूर्ण वाढ झाल्यानंतर ति ची कोषात रूपांतर होण्याची अवस्था सुरू होते. “Common emigrant” या फुलपाखराची अळी बहाव्याच्या पानाच्या खालच्या पृष्ठभागावर स्वतःला लाळेच्या सहाय्याने चि कटवते. अत्यंत मंद गतीने होणाऱ्या या प्रक्रियेत अळी आपली कातडी उतरवून कोषात रूपांतरि त होते. कोष ही स्थि र अवस्था असते. या काळात अळी काहीच खात नाही व हालचालही करत नाही. या अवस्थेत त्यांना धोकाही खूप जास्त असतो. त्याचमुळे बऱ्याच फुलपाखरांचे कोष हि रवे किंवा फांदीच्या रंगरूपाचे असतात. त्यामुळे ते भक्षकांना झाडांपेक्षा वेगळे ओळखता येणे कठीण असते. कोष कालांतराने गडद किंवा काळपट होत जातो. हा काळपटपणा कोषातील फुलपाखराची वाढ दर्शवि तो. पूर्ण गडद झालेल्या कोषात पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू असते आणि एका भल्या पहाटे ते कोषातून बाहेर येते हे मी वाचून ठेवले होते.

त्या मुळेच कोष गडद होऊ लागल्या पासून रोज पहाटे उठून सगळ्यात प्रथम मी ह्या कोषाला बारकाईने न्याहाळत असे. असेच एका भल्या पहाटे कोवळ्या उन्हात तो कोष एका बाजूने तडकला आणि ओलावल्या पंखानी हळुवारपणे पूर्ण वाढ झालेले संदु र फुलपाखरू बाहेर आले. कोषातनू हेर पडलेले फुलपाखरू लगेच उडण्यास असमर्थ असते. त्याने कोषावर बसूनच पंख वाळवलेआणि पंख वाळल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखंराचे दर्शन मला घडले. हा क्षण त्या फुलपाखराच्या आयुष्यातील सर्व अवस्थांमधील अत्यंत कठीण पण अत्यंत देखणा आणि संदुर अनुभव होता. रोज पहाटे उठून तो बघायला मि ळावा म्हणून केलेल्या प्रयासांमुळे, व त्याचे प्रसन्न फळ मि ळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान मानलं. पंख ओलावलेल्या अवस्थेत पक्षांनी फुलपाखरांना गाठू नयेम्हणून नि सर्गा नेच त्यांनी पहाटेच्या वेळेस बाहेर येण्याची योजना केली असावी.

फुलपाखरांचे आयुष्य ८ दि वसांपासून ८ ते ९ महि ने इतके कमी असते. या अल्पशा काळात त्यांना पक्षी, सरडे, चतुर, कोळी या भक्षकांपासून बचाव करत प्रजनन करावंलागतं. त्यांचंजीवनचक्र पूर्ण होण्याचंप्रमाण अत्यंत अल्प म्हणजे२ टक्के आहेहेवाचनात आले.

अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली की माझ्या बागेत असलेल्या सदाफुली, घाणेरी आणि एक्झॉरा ह्या फुलांवर जवळपास २५ ते३० वेगवेगळ्या जातीची फुलपाखरे आकर्षि त होत होती. तसेच कधी सडक्या, थोड्या कुजलेल्या फळाचा तुकडा टाकून न देता मी गच्चीत खारींसाठी ठेवत असे. त्या वरही अनेक संदु र फुलपाखरे बसलेली मी पहि ली आहेत. मधमाशांप्रमाणे परागीभवन करण्यात फुलपाखरांचाही मोठा वाटा आहे. त्यांचं जतन आणि संवर्धन त्यांचा अधि वास जपला तर नक्कीच होईल. आपल्या डोळ्यांना आनंददायी अशी ही फुलपाखरे आपल्याला जीवनाचा मन्त्र शि कवतात. आपल्याला त्यांचंसौंदर्य खुणावतं पण ते सौंदर्य मि ळवताना ज्या कठीण परि स्थि तीचा सामना करत तेति थेपोचलेहेमात्र आपण सहसा लक्षात घेत नाही.

कधी कधी एकटेपणाने माणसं ग्रासि त होतात. त्यावेळेला माणसांनी आठवावे की ह्या एकटेपणा आणि अलगीकरणाच्या वेळी त्या अळीला जेव्हा वाटलंकी ह्या बंदि स्त कोषात आपलं आयष्ु य आता संपलं, तव्े हाच पंख येऊन ति चंरूपांतर एका संदुर फुलपाखरात झालं.

तेव्हांमित्रांनो, हिम्मत न हरता आपणही ह्याच फुलपाखरांसारखी भरारी घेऊ शकतो! नक्की!

लेखक – क्षितिजा वागळे – kwagle.09@gmail.com
शब्दांकन – कल्याणी गाडगीळ – kalyani1804@gmail.com