नागपूरी वडाभात

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - ३ वाटया तांदूळ, १ वाटी मटकीचे कडधान्य, २ वाटया हरभर्‍याची डाळ, १ वाटी तुरीची डाळ, ३/४ वाटी उडदाची डाळ, कढीलिंब एक उहाळी, मूठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, ७-८ हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ, थोडे लाल तिखट, २ चमचा धने-जिरे पूड, मोहनासाठी तेल पाव वाटी. (हळद घालू नये)

कृती - दोन दिवस अगोदर मटकी पाण्यात भिजत घालून तिला मोड येऊ द्यावेत. बाकीच्या डाळी रात्री भिजत घालाव्यात. मोडाची मटकी व भिजलेल्या डाळी सर्व एकत्र करून सकाळी मीठ-मिरची, धने-जिरे पूड घालून जाडसर वाटाव्यात. वाटलेल्या डाळीचे, साबुदाणा वडे करतो त्या आकाराचे वडे करून तळून ठेवावे. नंतर ३ वाटया तांदुळाचा साधा मोकळा भात करून घ्यावा. ज्या तेलात वडे तळले तेच तेल गरम करायला ठेवावे. प्रत्येकाला पानावर भात वाढला की ४-५ वडे कुस्करून घालावे व वडे कुसकरल्यावर त्यावर वरील गरम तेल २-२ चमचे घालावे. जास्त तिखट खाणार्‍यांनी वरील तेलात ४/६ मिरच्या घालून तेल भातावर घ्यावे. ह्या वडा भाताबरोबर कढी करण्याची पध्दत नागपूरकडे आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा