उद्योगवार्ता

नाशिक : वाईन कॅपिटल ऑफ इंडिया

Nashik Wine देशातील सर्वांत जास्त वाईनरी कंपन्यां असल्याने देशाचे वाईन कॅपिटल अशी नवी ओळख नाशिक जिल्ह्याने निर्माण केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३५ वाईनरी आहेत. त्यांची सुमारे १ कोटी लिटरपर्यंत वाईन उत्पादनाची क्षमता आहे. त्यातील सुमारे ५० लाख लिटर वाईन्स भारतात विकली जाते. तर ७ लाख लीटरपर्यत वाईन निर्यात होते. अल्पावधीत वाईन उद्योग भरभराटीला येण्यामागे येथील भौगोलिक वातावरण आणि पूरक सोयी सुविधा हे प्रमुख कारण आहे.

नाशिक हे देशाचे वाईन कॅपीटल म्हणून ओळखल्या जाण्यामागची गेल्या दशकातील वाटचाल विलक्षण आहे. १९९९ ते २००९ या दशकात जिल्ह्यात ३५ वाईनरी सुरू झाल्या. २० हजार लिटर ते ५० लाख लिटरपर्यंत वाईन्स निर्मितीची क्षमता या वाईनरीत आहेत. महाराष्ट्र द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरणामुळे हे घडले. २००१ ला द्राक्ष प्रक्रिया जाहीर होण्यापूर्वी नाशिकला फक्त पिंपेन को-ऑपरेटिव्ह लि. आणि सामंत सोना वाईन्स लि या दोनच वाईनरी होत्या.

धोरण जाहीर झाल्यानंतर ३३ वाईनरी प्रकल्प उभारले गेले. नाशिकला व्यवसायानिमित्ताने येणा-या विदेशी पाहुण्यांचे या वाईनरी आकर्षण बनल्या आहेत. तसेच मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर आणि कोकणातून येणारे उद्योजक तसेच येथील व्यावसायिकही नाशिकच्या वाईन उद्योगांना भेटी देत, वाईन व फुडचा आस्वाद घेऊ लागले आहेत. नाशिकच्या वाईन उद्योगातील भरारीमुळे भारतात उच्च प्रतीची वाईन निर्माण होते हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारतीय वाईन उद्योगांत विदेशी गुंतवणूक व्हावी, वाईन पर्यटन वाढावे आणि रिसोर्टस्‌ हा आता प्रमुख उद्योग होण्याच्या दिशेने येथील वाईन-यांचे व्यवस्थापन सुरु झाले आहे. देशभरात वाईन्सची विक्री वाढू लागली आहे. जिल्ह्याच्या वाईन उद्योगाची वाटचाल अवघी १२ वर्षाची म्हणजे जेमतेम एक तपाची आहे. वाईनला जागतिक मार्केट उपलब्ध होउ शकल्यास आणि पंचतारांकित हॉटेलांमध्ये नाशिकच्या भारतीय वाईन्सला जागा मिळाल्यास अल्पावधीत नाशिकची वाईन जागतिक स्तरावर स्वताची ओळख निर्माण करु शकेल. अशा स्थितीत नाशिकचा वाईनरी उद्योग आहे.

नाशिकच्या वायनरी आणि त्यांच्या उत्पादन क्षमता

  • सामंत सोमा वाईन्स लि. गंगापूर रोड समोर (५० लाख लिटर),
  • गिरणा व्हॅली वायनरी, देवळा (पाच लाख लिटर)
  • नाशिक इंडिया ए-पी, दिंडोरी (एक लाख लिटर)
  • विन्सुरा वाईन्स प्रा. लि. निफाड (सहा लाख २५ हजार लिटर)
  • राजधीर वाईन प्रा. लि. देवळा (चार लाख ६० हजार लिटर)
  • व्ही.एम. अग्रोसॉफ्ट, निफाड (एक लाख ५० हजार लिटर)
  • एन.डी. वाईन्स प्रा. लि. पिंपळगाव बसवंत (दहा लाख ५० हजार लिटर)
  • वाईनरी, दिंडोरी (५० हजार लिटर)
  • फ्लेमिंगो वाईन्स प्रा. लि. निफाड (दोन लाख लिटर)
  • शिवप्रसाद वाईन्स, निफाड (२० हजार लिटर)
  • प्रथमेश वाईन्स प्रा. लि. (सात लाख लिटर)
  • विन्टेज वाईन्स प्रा. लि. , निफाड (दोन लाख लिटर)
  • इंटनव्ह्यु वाईनरी प्रा. लि., नाशिक (दोन लाख ६० हजार लिटर)
  • रेनेशान्स वाईनरी प्रा. लि. ओझर मिग. (सात लाख लिटर)
  • विकास वाईनरी प्रा. लि. दिंडोरी (३० हजार लिटर)
  • छाया वाईनरी प्रा. लि. दिंडोरी (३५ हजार लिटर)
  • सिग्मा वाईनरीज प्रा. लि. सिन्नर (एक लाख ६० हजार लिटर)
  • नॅचरल ब्रेव्ड प्रा. लि. दिंडोरी (एक लाख लिटर)
  • पेरनोड रिकार्ड इंडिया प्रा. लि. दिंडोरी (चार लाख लिटर)
  • टेर्रोर इंडिया वाईनरीज प्रा. लि. इगतपूरी (एक लाख ७० हजार लिटर)
  • वेनुस सेलेर प्रा. लि. दिंडोरी (तीन लाख ३० हजार लिटर)
  • सह्याद्री व्हॅली वाईनरी प्रा. लि. दिंडोरी (एक लाख लिटर)
  • इंडिया फूड कंपनी प्रा. लि. विंचूर (दोन लाख लिटर)
  • सनमिरा वाईनरी प्रा. लि. विंचूर (चार लाख ३० हजार लिटर)
  • बालरवी वाईनरी कंपनी प्रा. लि. विंचूर (६५ हजार लिटर)
  • र्क्युरी वाईनरी प्रा. लि. ओझरमीग (दोन लाख लिटर)
  • ए. डी. वाईन्स दिंडोरी (दोन लाख २५ हजार लिटर)
  • डि’ओरी वाईनरी प्रा. लि. दिंडोरी (पाच लाख लिटर)
  • योर्क वाईनरी (चार लाख १४ हजार लिटर)
  • व्हॅली डे विन प्रा. लि. (तीन लाख लिटर)
  • रेड विंगजस वाईनरी प्रा. लि. दिंडोरी (दोन लाख ४० हजार लिटर)
  • यू. बी. वाईन्स मालेगाव (दोन लाख लिटर)
  • व्हॅलोंने वाईनयार्ड प्रा. लि. इगतपुरी (दोन लाख लिटर)
  • पाल अस्टिंट वाईन मेकर, दिंडोरी (एक लाख ५० हजार लिटर)
  • सुला विनयार्डस, नाशिक (११ दशलक्ष लिटरपेक्षा जास्त)