उद्योगवार्ता मुख्यपान

उद्योजिका जोत्सना दप्तरदार यांना पुरस्कार

पर्यावरणाशी समतोल राखणारी डास अळीनाशकं व जंतूनाशकं आणि डास नियंत्रणाचे तंत्रशुध्द आराखडे बनवून राज्यातील पालिका क्षेत्रात त्यांचा वापर व्हावा, यासाठी प्रयत्नशील असलेल्या ज्योत्सना दप्तरदार आणि त्यांच्या मे. डॅपमन्स पेस्ट कंट्रोल ऍण्ड अलाइड सव्र्हिसेस या कंपनीचा भारत उद्योग रतन आणि राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दिल्लीत 'नॅशनल डेव्हलपमेंट थ्रू इंडिव्हिज्युल काँट्रिब्युशन' या विषयावरील ३२ वं अधिवेशन आणि वर्ल्ड इकॉनॉमिक प्रोग्राम सोसायटीचे प्लॅन्स ऍण्ड पॉलिसिज ऑफ नॅशनल डेव्हलपमेंट या विषयावरील राष्ट्रीय अधिवेशनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन १९९१ पासून पालिका क्षेत्रात डासनियंत्रणाचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण देणं तसंच या कामाचे तंत्रशुध्द आराखडे बनवून हिवतापवाहक डासांचा प्रादुर्भाव रोखण्याचं काम जोत्सना दप्तरदार करत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जंतूनाशक कार्बोफिनॉल पॉवर, वनस्पतीजन्य डास अळीनाशक व डास प्रतिबंधकांचे उत्पादनही त्यांच्या कंपनीतर्फे घेतलं जातं. वनस्पतीजन्य कीटकनाशकं पर्यावरणाशी समतोल राखणारी आहे. मानवी जिविताच्या दृष्टीनेही सुरक्षित आहेत. त्यामुळे सध्या प्रचलित असलेल्या रासायनिक कीटकनाशकांऐवजी वनस्पतीजन्य कीटकनाशकं बनवण्यासाठी पाश्चात्य देशही प्रयत्न करत असल्याचं जोत्सना दप्तरदार सांगतात. भारतात औषधी वनस्पती मुबलक असल्याने या वनस्पतीची लागवड आणि निर्मितीतून भारताला आर्थिकदृष्टया चांगला फायदा होऊ शकतो, असं त्याचं मत आहे. या पुरस्कारांनी आत्मविश्वास वाढवला असून यापुढे अधिक चांगलं काम करण्यासाठी बांधील असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान त्यांना ऑल इंडिया ऍवॉर्ड तसंच ऑफ इंडिया बिझनेस ऍण्ड कम्युनिटी फाऊण्डेशनच्या वतीने 'नॅशनल अचिव्हमेट ऍवार्ड फॉर कार्पोरेट लिडरशीप' पुरस्कार जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथे हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे.

महाराष्ट्रटाईम्सच्या सौजन्याने

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा