सेवासुविधा मुख्यपान

छंदवेडी माणसे


श्री. शांतीलाल फकिरचंद हिरण

नाशिकचे शांतीलाल हिरण हे नाशिक फिलाटेली सोसायटीचे अध्यक्ष तसेच नामको बँकेचे माजी संचालक असण्याबरोबरच नाशिकमधील अनेक संस्थांच्या उच्चपदावर आहेत. टपालाची तिकिटे जमविण्याचा छंद तसा अनेकांना असतो, परंतु हिरण यांना त्या तिकिटांच्या प्रकाशनाच्या दिवशीचे कव्हर तसेच त्यावर तिकिटासंबंधित व्यक्तिंच्या कुटुंबियांची स्वाक्षरी जमविण्याचा छंद आहे. शांतीलाल हिरण हे गेल्या 45 वर्षांपासून हा छंद जोपासत आहेत. तिकिटे चिकटविणे, कव्हरचा संग्रह त्यांचे जतन, वाळवीपासून संरक्षण ही कामे कटकटीची असूनही ते मनापासून करतात. त्यातून मनाला वेगळाच आनंद प्राप्त होतो, असे त्यांनी सांगितले. पूर्वी तिकिटीचे कव्हर घेण्यासाठी मुंबईतच जावे लागायचे 1 जानेवारी 1997 पासून ती नाशिकलाच उपलब्ध होतात. जी तिकिटे मिळत नाहीत ती हा छंद असणाऱ्या मित्र मंडळींकडून मिळत, तर काही तिकिट विक्रेत्यांकडून घ्यावी लागत. परंतू 1973 पासून पोस्टात PD A/C उघडून पोस्ट विभागामार्फत तिकिटे मिळवता येतात. शांतीलाल हिरण ह्यांच्या सहकार्याने नाशिक येथे 1991 साली जिल्हास्तरीय, 1998 साली राज्यस्तरीय व 2001 साली राष्ट्रीय स्तरावार फिलाटेलीची प्रदर्शने भरवली गेली.

६५६, रविवार पेठ, नाशिक -४२२००१
फोन - (०२५३) २५७८५१५
भ्रमणध्वनी - ९४२३१७३७७३

वसंत श्रीधर लोंढे

इन ऑरगॅनिक केमिस्ट्री विषयातली मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी 'मास्टर ऑफ सायन्स' प्राप्त झाल्यानंतर भाभा अणुसंशोधन केंद्राच्या 'हेल्थ फिजिक्स' विभागात कार्यरत राहून तेथूनच श्री. वसंत श्रीधर लोंढे सिनियर साएंटिफिक अधिकारी पदावरुन निवृत्त झाले. विदेशी जर्नलस् मधे त्यांचे काही साएंटिफिक शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. वयाच्या 12 वर्षापासून त्यांना टपाल पत्रमुद्रासंग्रहाचा (फिलाटेली) छंद होता. भारतीय टपाल खात्यानें महान व्यक्तींच्या स्मृत्यर्थ प्रसृत केलेली तसेच संरक्षणविषयक टपाल तिकीटांच्या संग्रहाची त्यांना विशेष आवड होती. या छंदाने सन्मानाबरोबरच अनेक पदके मिळवून दिली. सप्टेंबर 2003 मधील मुंबई विभागाच्या 'मुंबई पेक्स' फिलाटेलिक प्रदर्शनात ब्रॉन्झ मेडल प्राप्त झाले. फेब्रुवारी 2004 च्या ठाणे फिलाटेलीक फेस्टिवलमधे ठाणे म्युनिसिपल कमिशनर यांच्या हस्ते त्यांना सन्मानीत करण्यात आले. तर ठाणे जिल्हास्तरीय ठाणेपेक्स 2005 च्या फिलाटेली प्रदर्शनात 'व्हर्मिल पदक' प्रदान करण्यात आले.

१२, आदित्य सहनिवास,
गोखले रोड, नौपाडा,
ठाणे(प)- ४००६०२

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF