सणवार मुख्यपान

१४ जानेवारीशी मकर संक्रातीचा संबंध नाही

२२ डिसेंबर रोजी उत्तरायणास सुरुवात होते. या दिवसापासून दिनमान मोठे होण्यास प्रारंभ होतो. या आनंदाप्रीत्यर्थ साजरा करण्याचा दिवस म्हणजे मकर संक्रांत. सूर्य मकर राशीत प्रवेश करतॊ तो दिवस. मकर संक्रांतीला फ़ार प्राचीन काळापासून महत्त्व प्राप्त झाले. महाभारतात पितामह भीष्म याच दिवसासाठी काही महिने बाणाच्या शय्येवर पडून होते. या दिवशी परलोकवाशी होणारा जीव जीवनमृत्युच्या चक्रातून सुटून मोक्ष प्राप्ती करतॊ असा समज आहे.

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी हा सण साजरा केला जातॊ. पंजाबमध्ये ’माघी’, मध्य प्रदेशात ’सुक्रांत’, दक्षिण भारतात ’पोंगल’, उत्तर प्रदेशात ’किचेरी’, या नावाने ओळखला जातॊ. परंतु तीळाचे महत्व मात्र सगळीकडे सारखे आहे. मकर संक्रांत १४ किंवा १४ जानेवारीला येते हे आपल्या सर्वांना माहिती आहे.

१४,१५ जानेवारीशी मकर संक्रांतीचा काहीही संबंध नाही असे प्रसिध्द पंचांगकर्ते दा. कृ.सोमण म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सूर्याने मकर राशीत प्रवेश करे पर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे आणि ६ सेकंद एवढा कालावधी लागतॊ. ग्रेगरीयन लेडर प्रमाणे लीप वर्ष गृहित धरुन सहा तासाचा हिशेब केला तर दर वर्षांनी मकर संक्रांतीचा दिवस ९ मिनिटे सहा सेकंद हा काल साठत जाऊन १५७ वर्षांनी संक्रांतीचा दिवस १ दिवसानी पुढे जातो.

इसवी सन २०० मध्ये मकर संक्रांत २२ डिसेंबरला होती. सन १८९९ मध्ये मकर संक्रांत १३ जानेवारीला आली होती. सन १९७२ पर्यंत संक्रात फ़क्त १४ जानेवारी येत होती. १९७२ पासून २०८५ पर्यंत मकर संक्रांत कधी १४ जानेवारी तर कधी १५ जानेवारीला येईल. अशा रितीने पुढे जात जात सन ३२४६ मध्ये संक्रांत चक्क १ फ़ेब्रुवार रोजी येईल.दि कल्याण जनता सहकारी बँक लि. च्या सौजन्याने

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF