पारंपारिक पेहराव

परकर-पोलके

पारंपारिक म्हणून नावाजलेले परकर-पोलके,  मुलगी तीन वर्षांची झाली की मुलीची आत्या आपल्या भाची साठी पहिल्यांदा परकर-पोलके शिवायची. मुलगी वयात येईपर्यंत ती ते वापरत असे. हे  परकर-पोलके मुखत्वे करून  धटवाडी खणाचे असे. पूर्वी बायका घरातच ते शिवणकाम करीत असत. कमरेपर्यंत शिवलेले पोलकं आकर्षक दिसवं म्हणून  फुगा बाही, पफ बाही  कौतूकाने शिवली जात असे. केसांच्या घटट रिबीनी लावलेल्या दोन वेण्या, पायात पैंजण, पोटापर्यंत उंचीचा पोलका आणि पायाच्या लांबी इतका परकर असा बहुतेक मुलींचा पेहराव असे.

प्रिंटेड चिट चा कपडा वापरायची त्या काळी आवड होती. त्यावरची नक्षी ही नाजूक पण आकर्षक असायची. किशोरवयीन वयातील चंचलता, आणि दंग मस्ती लक्षात घेऊनच हा पेहेराव बनवला गेला होता.  मुलींना खेळतांना परकराचा छानसा ओचाही बांधता यायचा. हल्ली पारंपारिक परकर पोलक्यात आधुनिक बदल करून आवडीने घातले जातात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF