गणपती विशेष मुख्यपान

श्री गणेश पूजा कशी करावी ?

आचमन : ॐ केशवाय नम:। ॐ नारायणाय नम:। ॐ माधवाय नम:। या नावांनी दोनदा आचमने करावी. ॐ गोविंदाय नम:। या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा. 
आसनशुध्दी : भूमीला स्पर्श करून ही शुध्दी करावी लागते. 
भूतोत्सारण : हातात अक्षता घेऊन दक्षिणेस फेकाव्या. 
षडंगन्यास : शरीरशुध्यर्थ मांडी घालून दोन्ही हातांनी न्यास करावे. 
कलश पूजा : पाणी भरलेल्या कलशाला गंध-अक्षता लावलेले फूल चिकटवावे. भारतीय संस्कतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक. शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून आपल्या सहा अंगांसह सर्व वेद या कलशात आहेत. 
शंखपूजा : शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा. 
घंटा-पूजा : घंटानादं कुर्यात्-घंटा वाजवावी. घंटेला गंध,अक्षता, फूल, व हळदकुंकू वाहावे. 
दीपपूजा : समईला फुलाने गंध, फूल व हळदकुंकू लावावे. 
प्रोक्षण : दुर्वांनी पूजा साहित्यावर व स्वत:वर पाणी शिंपडावे. 
प्राणप्रतिष्ठा : दोन दुर्वांकुरांनी गणपतीला स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी. ताम्हनात एक पळी पाणी उजव्या हातावरून सोडावे. नंतर दुर्वांकुरांने गणपतीच्या पायाला स्पर्श करावा.
अभिषेक : गणपतीवर फुलाने किंवा दुर्वांकुराने पाणी शिंपडावे आणि अभिषेक करावा.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF