नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

शहेनशहा अमिताभ


शहेनशहा अमिताभ: खिळवून ठेवणारी चरित्रकहाणी

अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टार हिंदी चित्रपटसॄष्टिच्या इतिहासात झाला नाही. त्याच्याएवढी लोकक्रप्रियता कुणाला मिळाली नाही. त्याच्याइतके प्रेम कुणाच्याही वाटयाला आले नाही. त्याच्याइतका दीर्घकाळ उच्च स्थानी टिकून राहिलेला अभिनेता दुसरा झाला नाही. त्याच्या भाव-भावनांनी ओतप्रोत असलेल्या व्यक्तिरेखांमध्ये लोक जेवढे गुंतले, तेवढे इतर कुणातही गुंतले नाहीत. १९७० ते ८० या अस्वस्थ दशकाच्या या 'अगदी यंग' नायकाने हिन्दी चित्रपट जनमानसाच्या पातळीवर आणले. १९७० च्या दशकातला अमिताभ सुपरस्टार होता आणि आजचा अमिताभही वेगळ्या माध्यमातून - दूरचित्रवाणीच्या वाहिनीद्वारे सुपरस्टारच बनला आहे. हिन्दी चित्रपटसॄष्टितील 'अमिताभ पर्व संपले' अशी भाषाबोलली जात असतानाच त्याला पुर्नजन्म मिळाला आहे छोटया पडद्याच्या माध्यमातून. 'चलो, हम ऒर आप मिलकर खेलते हॆ , कॊन बनेगा करोडपती' ची मजा अनुभवण्यासाठी लाखो प्रेक्षक रात्री नऊ वाजता दूरचित्रवाणी संचासमोर बसू लागले आहेत. 'शहेनशहा' नंतर कित्येक वर्षांनी प्रथमच अमिताभचे संवाद लोकप्रिय होऊ लागले. 'कॉन्फीडंन्ट?', 'शुअर?', 'लॉक किया जाए?', हे शब्द घराघरांत पोचले आहेत. त्यावर विनोद रचले जाऊ लागले आहेत. 'के.बी.सी. (कॊन बनेगा करोडपती?) विनोद' ई-मेल वरून जगभर पोचले आहेत.

भारतीय जनमानसावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाय्रा अमिताभ बच्चनच्या भव्य जीवनाचा आलेख सहजसोप्या परंतु शॆलीदार मराठीत चितारण्याचा प्रयत्न 'शहेनशहा अमिताभ' या पुस्तकात बाबू मोशाय यांनी केला आहे.

कालचा अमिताभ चांगला होता की आजचा अधिक चांगला आहे? या दोन्हीत काही फरक आहे का? अमिताभने आमची निराशा केली, की आशा जागवली? अमिताभ बच्चन आता पॆशाचा गुलाम होऊन स्वत:चे स्वातंत्र्य गमावून बसला आहे, की तो दु:खी जनांना सुखी बनण्याची स्वप्ने आणि सुखी माणसाचे सदरे वाटत सुटला आहे? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत बाबू मोशायनी हे चरित्र लेखन केलं आहे. त्यात अमिताभच्या जीवनातील चढउतारांचा आलेख मांडत असतानाच अमिताभबद्दलच्या प्रांजळ आणि प्रसंगी परखड भावनाही लेखकाने व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे अमिताभविषयी आस्था आणि प्रेम बाळगणाय्रा वाचकालादेखील लेखक आपल्याच मनातील भावनांना शब्दरूप देत आहे असं वाटेल. हिंदीतील ख्यातनाम कवी हरिवंशराय बच्चन आणि तेजी बच्चन हे अमिताभचे आईवडील. त्यांची नेहरू घराण्याशी असलेली जवळीक, त्यांनी मुलांवर केलेले संस्कार, अमिताभचा चित्रपटसॄष्टीत प्रवेश हे सारे 'जडणघडणीचे दिवस' या प्रकरणात वाचताना फारच रोचक वाटते. 'निराशेच्या मेघांनी आयुष्य झाकळून द्यायचे नाही, तुम्हाला घरात जायचे असेल व तुमची किल्ली हरवली असेल, तर अशावेळी भिंतीवर चढून पलीकडे प्रवेश करायचा' ही वॄती हरिवंशराय यांनी मुलांच्या अंगी बाणवली होती. या एकाच वाक्यातून अमिताभच्या या चरित्रलेखनाची दिशा स्पष्ट होते. या चरित्रलेखनाच्या सुरवातीप्रमाणेच त्याचा शेवटही लेखकाने अतिशय समर्पक केला आहे.

माणसे गोंधळून गेली आहेत. आपण या माहिती-क्रांतीच्या जगात कालबाह्य ठरू अशी भीती केवळ प्रॊढांनाच नाही तर तरुणांनाही वाटत आहे. त्यामुळे साठीकडे झुकलेल्या अमिताभ बच्चनची वॆचारिक-मानसिक गोची होणे समजू शकते. ही केवळ अमिताभची गोची नाही, ही त्याच्या पिढीचीच गोची आहे. त्याने साध्य व साधने दोहोंचे भान ठेवून मार्गावर यावे. पण आता मिळविलेले नाव व प्रतिष्ठा जाईल असा तरी व्यवहार करू नये. यापुढे तरी करोडपती अमिताभ बच्चन तसे करणार नाही, असा असंख्य प्रेक्षकांचा विश्वास आहे.

अमिताभच्या चित्रपटांप्रमाणेच त्याचे हे चरित्रही प्रारंभापासून अखेरपर्यंत वाचकांना खिळ्वून ठेवणारे, अत्यंत वाचनीय आहे.

शहेनशहा अमिताभ
लेखक - बाबू मोशाय
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे ४११ ०३०
E-mail -  हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
पृष्ठे : ३५८, मूल्य : २२५ रुपये

 
 

कविता स्मरणातल्या : एक सुंदर स्वप्नरंजन

ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके यांचं कविताप्रेम सर्वांना ठाऊक आहे. जुन्या-नव्या कवितेचा त्यांचा व्यासंग मोठा, सर्वस्पर्शी आहे. त्या स्वत: कवयित्री आहेत; पण त्याहीपेक्षा त्या एक चोखंदळ, रसिक काव्यप्रेमी आहेत. काही काळापूर्वी 'अंतर्नाद' मासिकामधून ’कविता स्मरणातल्या' या सदरातून आपल्याला आवडलेल्या व स्मरणात राहिलेल्या पंचवीस कवितांवर शांताबाईंनी रसग्रहणात्मक लेख लिहिले. ते या पुस्तकातून प्रथमच एकत्रित स्वरूपात प्रकाशित झाले आहेत. काव्यविषयक स्मरणरंजनात रस घेणं हा शान्ताबाईंच्या व्यक्तिमत्वाचा एक ठळक विशेष म्हणून सांगता येईल. त्यांच्या या स्वभाववॆशिष्टयाचं प्रतिबिंब त्यांच्या कवितांच्या निवडीतही पडलेलं दिसतं. तरूण वयात आपली काव्यविषयक अभिरुची सिध्द करणाय्रा रविकिरण मंडळातील कवी आणि नंतरचे अनिल, कुसुमाग्रज, बोरकर, ना.घ. देशपांडे यांच्यापर्यंत येऊन शान्ताबाई थांबल्या आहेत.

शान्ताबाईंनी या लेखसंग्रहाच्या प्रारंभी म्हटलं आहे, 'बालपणापासून समोर येईल ती नवी-जुनी, बरी-वाईट कविता मी एका अनावर ओढीने , अबोध आकर्षणाने वाचत राहिले. काही कवितांमधील नादमय शब्दांनी मला भुरळ घातली. काहींची कल्पनारंजित , अलंकारिक रचना मला आवडली. सहजपणे अर्थ उमगावा आणि तो मनात झिरपत राहावा, असे काही कवितांच्या बाबतीत घडले, तर काही कविता मला कोणत्याही स्पष्टीकरणापलीकडच्या काही आंतरिक, अगम्य कारणांमुळे प्रिय झाल्या. वय वाढत गेलं. अभिरुचीत बदल झाला, तसतशा जुन्या काही कविता मला आवडेनाशा होऊन नवीन कवितांनी त्यांची जागा घेतली. पण या कोणत्याही बदलत्या परिस्थितीचा ज्यांवर काही परिणाम झाला नाही, अशा अनेक कविता मनात तशाच स्थिर स्वरूपात टिकून राहिल्या. मुख्यत्वे अशा कवितांवर मी लिहिले आहे.'

शान्ताबाईंच्या पिढीतल्या मंडळींना तर हे स्मरणरंजन आवडेलच, परंतु त्यानंतरच्या पिढीतल्या, कवितेवर मन:पूर्वक प्रेम करणाय्रा रसिकांना, कवींनाही हे लेख आवडतील यात शंका नाही. दुडुम दुडुम वाजतो नगारा (अज्ञातवासी), कोण जाणे ते कशाला (अविनाश पाटणकर), अजुनि चालतोचि वाट (ए.पां. हळदाळकर), वाढत्या सांजवेळे (बा.भ. बोरकर), विसरशील खास मला (ज.के. उपाध्ये), घरि एकच पणती मिणमिणती (वि.स.खांडेकर),मी घरात आले (पद्मा), डोळा वाटुली संपेना (इंदिरा संत)..... अशा कितीतरी कविता आणि त्यावरची शान्ताबाईंची रसग्रहणात्मक टिपणं या संग्रहात आपल्याला वाचायला मिळतात.

कविता स्मरणातल्या
लेखक : शान्ता ज. शेळके
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस,
१२१६ सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०
फोन : (०२०)४४७६९२४
e-mail :  हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
पॄष्ठे : १६०, मुल्य : १०० रुपये

 
 

डॉट.कॉम - संगणक-इंटरनेट पर्वाची ओळख

आजचं युग हे ओळखलं जातंय 'माहितीयुग' या नावानं. माहितीचा प्रचंड प्रस्फोट हे या युगाचं वॆशिष्ट्य. भरभरून वाहणारा माहितीचा प्रवाह आपल्या अंगणात वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाला आहे. वॄत्तपत्र, रेडिओ, टि.व्ही. , खाजगी-सरकरी वाहिन्यांचा वाढता प्रवाह - या साय्रांचा प्रभाव या काळावर पडला आहे. हे सारं असुनही या सा्य्रांच्या वर दशांमुळे एक माध्यम वाढतं आहे - इंटरनेटचं. संगणक, इंटरनेट, वर्ल्ड वाइड वेब (ड्ब्ल्यू. ड्ब्ल्यू. ड्ब्ल्यू.), सायबरस्पेस, सर्च इंजिन्स हे सारे शब्द जणू आज परवलीचे शब्द झाले आहेत. या नव्या माध्यमाच्या वादळानं, तंत्रानं या काळाचा चेहरामोहराच बदललाय किंवा खरं तर नवा चेहरा दिलाय. आताची पिढी ही या माध्यमातून मिळणा्य्रा माहितीवर जगत आहे. 'माहिती युग' हे नाव या युगाला मिळण्यामागे आणि जी वॆचारिक संस्कॄती इथं आकाराला येत आहे त्यातही या माध्यमाचा सिंहाचा वाटा आहे. या माध्यमावर अवलंबून राहणं यापुढच्या काळात वाढतच जाणार हे उघड आहे. आपल्याकडेदेखील संगणकाची भीती नाहीशी होत आहे. त्याचे उपयोग लक्षात येत आहेत, त्यातून मिळणारे फायदे अनुभवाला येत आहेत. शहरातली तरूण पिढी सायबर कॅफेत जाऊन सर्फींग, चॅट करण्यात तासंनतास मग्न होत आहेत. ई-मेल, व्हॉइस मेलद्वारे सारं जग जवळ येत चाललं आहे. अशा रितीनं संगणक-युग झपाटयाने विस्तारत असलं तरी अजूनही कोटयवधी सुशिक्षित लोक या संगणक संस्कॄतीपासून मानसिकदॄष्ट्या दूर आहेत. इंटरनेटच्या अथांग , अफाट सायबरविश्वात ते आलेले नाहीत. त्यांना संगणकयूगाच्या संज्ञाही माहीत नाहीत. भीती जाते आहे. कुतुहल वाढते आहे. अशा वेळेस संगणक-इंटरनेट पर्वाची ओळख करून देणं ही आजची सांस्कॄतिक गरज आहे. 'महाराष्ट टाइम्स' या मुंबईहून प्रसिध्द होणा्य्रा मराठी दॆनिकात दर आठवडयाला 'हॅलो इंटरनेट' हे सदर लिहिणारे तरूण पत्रकार आी. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या 'डॉट.कॉम' या लहानशा, पण अगदी थेट भिडणाय्रा पुस्तकामुळे असे असंख्य वाचक सायबर-विश्वाचे नागरिकक्र होऊ शकतील. आी गिरीश कुबेर यांनी या पुस्तकातून संगणक-इंटरनेट पर्वाची अतिशय सोप्या, ओघवत्या मराठीत ओळख करून दिली आहे.

संगणकाचा जन्म नक्की कधी झाला? इंटरनेट आणि इंटरानेट म्हणजे नक्की काय? - इथपासून ते अगदी सायबर रोमान्स, इंटरनेट टेलिकॉन्फरंस, ई-कॉमर्सची अपरिहार्यता, येथपर्यंत सारं काही सोप्या भाषेत दॆनंदिन व्यवहारातली उदाहरणं घेऊन समजावून सांगत या अनोख्या जगाची धावती सफर लेखक घडवून आणतो. भविष्याचा वेध घेता घेता या नव्या युगाची परिभाषाही तो सांगतो.

अशा नव्या तंत्राला सामोरं जाण्यासाठी, त्यासाठी मनोभूमिका तयार करण्यासाठी समाजाची मशागत करावी लागते. याच्यातच नेमके आपण कमी पडतो, असं सांगून गिरीश कुबेर म्हणतात की प्रत्येकाने आपल्याच विकासाची जबाबदारी आपणहून उचलली पाहिजे. माहिती-तंत्रज्ञानाच्या, इंटरनेटच्या क्षेत्रात जे कोणी असे प्रयत्न करीत असतील, त्यांना मदत व्हावी यासाठीच या पुस्तकाचा प्रपंच !

डॉट. कॉम
लेखक : गिरीश विनायक कुबेर
प्रकाशक - नवचॆतन्य प्रकाशन, ए-००२, तळमजला, 
शशांक को-ऑप. हाउसिंग सोसायटी
योगीनगर कॉर्नर, सु्श्रुत हॉस्पिटलजवळ,
एक्सर रोड, बोरिवली (पश्चिम),
मुंबई ४००० २९१

पॄष्ठे : १२२, मुल्य : ७५ रुपये

 
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा