नवीन काय वाचाल? मुख्यपान

 

मी आणि माझा देव


वाक्प्रचारांपासुन परमेश्वर चराचर व्यापून राहिला आहे. 'देव माझा सखा, सहचर, पिता' अशी देवाशी अगदी सलगी करण्यापासून ते 'परमेश्वराला रिटायर करा', 'विषमता निर्मिणारी देव संकल्पना खोटी आणि त्याज्य वाटते' अशी अगदी टोकाची मतं मांडण्यापर्यंत लोकांची मजल गेलेली दिसते. देव-धर्म संकल्पना आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडित आहेत. अगदी सर्वसामान्य माणसापासून उच्चवर्ण व्यक्तींपर्यंत सर्वजण देवाचा विचार आपापल्या परीने करीत असतात.

खरं म्हणजे अगदी लहानपणापासून देवाशी आपलं सर्वांचंच नातं जडलेलं असतं. सकाळी घरात होणारी देवपूजा, संध्याकाळी देवापुढं बसून म्हटलेली 'शुभं करोती' ही प्रार्थना, काही आगळीक घडली तर 'देवबाप्पा कान कापील' ही वडिलधाय्रां कडून ऐकायला मिळालेली धमकी, अशा वातावरणात मोठं होत असताना देवाबद्दलचं कुतुहल वाढतच जातं. तारुण्यात प्रवेश करताना 'खरंच देव आहे का?' हा प्रश्न छळायला लागतो. घरातले देवाधर्माचे संस्कार, आजुबाजुचे धार्मिक -सांस्कारिक जीवन, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील घडामोडी, जीवनातले स्वत:चे अनुभव यांमुळे देव संकक्रल्पनेविषयी अनेक प्रश्न पडायला सुरुवात होते. स्वत:पुरती देवाबद्दलची कल्पना निश्चित आकार घेत असतानाच आपल्या मनातलं देवाविषयीचे कुतुहल अधिकच वाढत जातं. आपल्याप्रमाणे इतरांचीही देवाबद्दल काही कल्पना असेल, सभोवतालच्या अनेक क्षेत्रांत वावरणाय्रा नामवंतांना देवाबद्दल काय वाटत असेल, त्यांच्यातल्या आस्तिक किंवा नास्तिक व्यक्ती देवाविषयी कोणती भूमिका घेतात, अशा काही प्रश्नांची उत्तरे मिळावीत असं सगळ्यांनाच वाटत असतं. सर्वांच्या मनातलं हे कुतुहल विचारात घेऊनच 'मॅजेस्टिक प्रकाशना' साठी प्रा.वि. शं. चॊघुले यांनी 'मी आणि माझा देव' हा लेखसंग्रह संपादित केला आहे.

'मी आणि माझा देव' या पुस्तकात एकूण सोळा लेख आणि पाच मुलाखती आहेत. त्यांत भिन्न-भिन्न क्षेत्रातील लेखकांनी परमेश्वर आणि धर्माविषयी आपली मतं मांडली आहेत. निरीश्वरवादी भुमिका घेऊन देवाला पस्णफपणे नाकारणे, देव संकल्पना खोटी ठरविणे ही त्यांतील एक मतप्रणाली आहे. आएापस्वफकक्र इफश्वरसंकक्रल्पना स्वीकारणे हा दुसरा विचारप्रवाह आहे. ईश्वरसंकल्पना तिच्या मर्यादांसह स्वीकारून परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ घालून समन्वयशील विचार मांडणे ही आणखी एक विचारधारा आहे. मराठीतील अग्रगण्य कवी मंगेश पाडगावकर, कथाकार शांताराम उर्फ के.ज. पुरोहित, व्यासंगी वक्ते व लेखक प्रा. राम शेवाळकर, सामाजिक क्षेत्रातील क्रियाशील कार्यकर्ते व लेखक अनिल अवचट, तत्वज्ञांचे संशोधक प्राध्यापक दि.य. देशपांडे, होमी भाभा विझान शिक्षण संस्थेचे संस्थापक - संचालक डॉ. वि.गो. कुलकर्णी, आघाडीचे संगीतकार यशवंत देव, निवभ्एा न्यायमर्स्ती चंद्रशेखर धमाफधिकारी, फादर /फ्रांन्सिस दिब्रिटो, प्रख्यात फिजिशियन डॉ. केक्र. राममर्स्ती, शल्यविशारद डॉ. वि. ना. आखंडे , डॉ. नितू मांडके, माजी खासदार प्रमिला दंडवते, उद्योगपती सुभाष दांडेकर इत्यादी प्रतिभावंतांचे लेख व मुलाखती या पुस्तकत समाविष्ट आहेत.

मी आणि माझा देव
संपादक - प्रा. वि.शं. चॊघुले
प्रकाशक - मॅजेस्टिक प्रकाशन, 
८ फिनिक्स, ३ रा मजला, ४५७ एस.व्ही.पी रोड, 
गिरगाव, मुंबइफ ४०० ००४.
दस्रध्वनी - (०२२) ३८२६८८५
इमेल - हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

पॄष्ठे - २०४, किंमत - रुपये - १७०.००

 
 

खळखळाट

'चिअर्स' हे सांज लोकसत्ता मध्ये प्रकक्राशित होणारे आणि अगदी सलामीच्या लेखापासून प्रचंड वाचकप्रियता मिळविणारे सदर. दर मंगळवारी वाचकांशी प्रत्यक्ष चषक हातात न घेता केलेले 'चिअर्स' हा मुंबइफकरांचा विरंगुळा होता. त्या त्या घडीला घडणारे राजकारण, समाजकारण, क्रीडा, चंदेरी विश्वातल्या घडामोडी यांतील सस्त्रे घेऊन सामान्य माणसाच्या जीवनाशी त्याची विनोदी सांगड घालणारे छोटेछोटे लेख असे त्याचे स्वरूप आहे. प्रत्येक घडामोडीकडे वेगळ्याच चष्म्यातून पहाण्याचा सुधीर सुखठणकर या लेखकच्या प्रवभ्एाीमुळे या दभ्नंदिन घटनांमधील विनोदी परिणामांचे मजेशीर किस्से तयार होतात. त्यामुळेच सोमस् व शलस् सदावर्ते हे जोडपे, सपट, चिरपुटकर, पय्गुळलेकक्रर आणि राहु-केतू ही मुले ही सर्व मंडळी आपलीच वाटतात. लेखांची शीर्षकेसुध्दा विनोदी आहेत उदा. 'पएोपे सएाा', 'आता फक्त नेन्यांची' (अर्थातच माधुरी दीक्षित), सचिन(तेंडुलकर)ची बॅट्दुखी इत्यादी. याआधीचे आी सुखठणकक्रर यांचे 'चिअर्स' या सदरांतील निवडक सदरे घेऊन केलेले 'खटयाळकी' नावाचे पुस्तक फार गाजले होते.

'आता फक्त नेन्यांची' ही आजच्या आघाडीच्या सुप्रसिध्द सिनेतारकेच्या लग्नाची गोष्ट अत्यंत रंजक आहे. माधुरीच्या नवय्राने म्हणे माधुरीचा एकही सिनेमा पाहिला नाही. शेवटी 'श्रीराम नेने' या अमेरिकस्थ डॉक्टरशी तिचे लग्न कसे पारंपारिक प्रथेनुसार - म्हणजे मुलीचे फोटो पहाणे, पत्रिका जुळणे इत्यादी पध्दतीने- घडते हे अत्यंत खुमासदार पध्दतीने लिहिले आहे. माधुरीने घेतलेला उखाणा धमाल आहे.

'आत्तापर्यंत होते करोडो प्रेक्षकांची
श्रीरामांचं नाव घेते आता फक्त नेन्यांची'

'बिहारी लोकशाही' या लेखामधे 'राहस्' हा मुलगा, सामान्य माणसाला नेहमी पडणाय्रा राजकीय शंकांना तोंड फेकतो. त्याचे प्रश्न अत्यंत निर्व्याज पण अत्यंत मार्मिक आहेत. उदा. 'बाबा लोकशाहीत बंदुक कशाला लागतात?' किंवा 'पण बाबा, त्या उमेदवाराच्या नावावर शंभर गुन्ह्यांची नोंद आहे. आणि तरी पोलीस त्याला पकक्रडत नाहीत, असं कसं हो बाबा?' यात बिहारच्या 'लोकशाही(?)' वर छान टीका आहे.

शिक्षणक्षेत्रातील झालेली घसरण आणि 'क्लासवाल्यांची चलती' हा विषय 'अभिनंदन' या लेखात हाताळला आहे. ८३ टक्के मार्क मिळविलेल्या मुलाचे पालक, आपल्या पाल्याला 'जिगरवाल' क्लासमधे प्रवेश मिळणार नाही या काळजीने रास्त आहेत कारण त्या क्लासच्या प्रवेशाला कमीतकमी ९१.३ टक्के मार्क आवश्यक आहेत. आणि या क्लासलाच जर प्रवेश मिळाला नाही तर पुढे बारावी, इंजिनिअरिंगचे काय होणार? याउलट ३८ टक्के मार्क मिळविणा-या मुलाचे वडील 'आी सपट' खूष आहेत कारण कमी मार्क मिळ्वुन मुलाने शिक्षणावर खर्च होणारे लाखो रुपये वाचवले म्हणून. त्या वाचलेल्या रकमेपॆकी काही रकक्रमेचे कक्रजफ कक्राढस्न , पुढे मागे मुलाला 'क्लास' काढून देण्याचे अत्यंत व्यवहारी स्वप्न पहातो आणि समाधान पावतो.

एकूणच 'खळखळाट' हा खरा हास्यमळा आहे, चिमटे घेत घेत हसायला लावणारा.

खळखळाट
लेखक - सुधीर सुखठणकर , ११ माहीम हाऊस, मोगल लेन, माहीम , मुंबई ४०० ०१६
दूरध्वनी - ०२२-४३७३७१९. इ-मेल हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.
प्रकाशक - नितीन हिरवे, संवेदना प्रकाशन, बी/३, कल्याणदासवाडी,डॉ. आंबेडकर रोड, मुंबई ४०००१२.
दूरध्वनी -०२२-३७३१७३२ 
पॄष्ठे - १२८, किंमत : रुपये १०० फक्त

 
 

कॄष्णविवरे (Black holes) या शास्त्रीय सत्याविषयी लिहिलेले पुस्तक.

बंगालचा नबाब सिराज उदाभ्लाने १७५७ साली इंग्रजांना छोटया अंधाय्रा खोलीत पकडल्याने 'ब्लॅकहोल ऑफ कक्रलकक्रएाा' असे नाव प्रचारात आले. परंतु या ऐतिहासिक संकल्पनेला शास्त्रीय दॄष्टया अर्थ प्राप्त व्हायला १९६९ साल उजाडावे लागले. याचे ओय अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ जॉन व्हीलर यांना जाते. वास्तविक कॄष्णविवरेवरच्या संशोधनाचे श्रेय १९३५ सालीच तरूण भारतीय खगोलशास्त्रझ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना मिळायला हवे होते, पण मिळाले नाही. कॄष्णविवर ही संकल्पना अलीकडे प्रसारमाध्यमे, मासिके, पुस्तके आणि विज्ञानकथांतून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचली आहे. 'गुढतेबद्दल कुतुहल हा मानवी मनाचा स्थायीभाव आहे', असे व्यापक सापेक्षतेच्या सिध्दांताचा जनक अल्बर्ट आइन्स्टान म्हणतो. कॄष्णविवरे या आकाशातील अत्यंत गुढ वस्तु आहेत. आधुनिक दुर्बिणींचा आणि तंत्रझानाचा उपयोग करून खगोलीय निरीक्षणतंत्रात खरच प्रगती झाल्याने पुर्वी अशक्य वाटणारे वेध आता शक्य झाले आहेत. अशा वेधातून विश्वातील अनेकक्र गुढ गोष्टींचे स्वरूप आजकाल अधिककाधिक स्पष्ट होत आहे.

'कॄष्णविवरे' ही मोठया ताय्राच्या जीवनातील शेवटची अवस्था असते. अशा ताय्रातील अणुइंधन संपले की, तो स्वत:च्या कय्क्रद्राकक्रडे ढासळू लागतो. त्यामुळे त्याचे गुरुक्रत्वाकर्षण प्रचंड होते. परिणामी त्याच्यापासस्न प्रकाशही बाहेर पडत नाही. प्रकाश बाहेर पडत नसल्याने तो तारा दिसत नाही. यालाच 'कॄष्णविवर' म्हणतात. कॄष्णविवर म्हणजे निश्चित कडा असलेले विवर. त्यात पडेल ते गिळंकॄत करून, आपल्या प्रचंड गुरुक्रत्वाकर्षणामुळे प्रकाशालाही ते पकडून ठेवते. कॄष्णविवराच्या आत स्थलाचे व कालांचे गुणधर्म अत्यंत आश्र्चर्यकारकरित्या बदलतात. या ठिकाणी नेहमीचे भॊतिकशास्त्रातील नियम निरुपयोगी ठरतात.

या पुस्तकत एकदम कॄष्णविवरांकडे वाचकांना न नेता, सुरुवातीला आपले विश्व व ताय्रांच्या निर्मितीची माहिती दिली आहे. माणसांच्या जन्माचा मार्ग एकच असला तरी मरणाचे मार्ग विविध असतात. त्याचप्रमाणे ता्य्रांचा शेवटही वेगवेगळ्या पध्दतीने होतो. ही माहिती करून घेताना या पुस्तकात श्वेतबटस् , न्युटॉन, पल्सार इत्यादींची माहिती सुलभरित्या मिळते. त्यानंतर कॄष्णविवरांची रचना, त्यांचे प्रमुख घटक, इत्यादींची सचित्र महिती सर्वसामान्य माणसाला सोप्या भाषेत करून देण्याचा प्रा. पाटील यांचा प्रयत्न आहे. आजच्या आघाडीच्या शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी विश्व निर्मितीच्या वेळी निर्माण झालेल्या सुक्ष्मकॄष्णविवरांवर जे संशोधन केले आहे त्याविषयी माहितीही येथे दिलेली आहे.

पुस्तकक्रात शेवटी दिलेल्या शब्दार्थांमुळे व पारिभाषिक शब्दांच्या मराठी समानधर्मी शब्दांमुळे हे पुस्तक कुतुहल असलेल्या कोणत्याही सर्वसामान्य वाचकांची उत्कंठा भागवु शकेल.

मराठी भाषेत या विषयावर सोप्या भाषेत लिहिलेले हे एकक्रमेव पुस्तक आहे.

कॄष्णविवरे - आकाशातील प्रकाशाचे सापळे 
लेखक -  डॉ. निवास पांडुरंग पाटील, १/१६ साईदेव हाउसिंग सोसायटी, गंगापूर रोड, नाशिक ४२२००५. दस्रध्वनी - ०२५३-५७९१२५
प्रकशक - अनिरुध्द अनंत कुलकर्णी, कक्रा टिनय्टल प्रकक्राशन, विजयानगर, पुणे ४११ ०३०
दुरध्वनी -०२०-४३३७९८२

पष्ठे - ११४, किंमत : रुपये ६० फक्त

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा