कुंभमेळा सी. डी – २००३-०४

kumbhmela-cd भारतातील सर्वात मोठा आणि अतिशय प्रेक्षणीय असा सोहळा म्हणजे, कुंभमेळा. हा विराट मेळावा सर्वसाधारणपणे दर १२ वर्षांनी हरीद्वार, प्रयाग, नाशिक, त्र्यंबक व उज्जैन या ठराविक ठिकाणी भरतो. आगामी कुंभमेळा हा नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २००३ रोजी भरणार आहे. दरसालप्रमाणे हया अनादी काळापासून चालत आलेल्या सोहळयात देशभरातील लाखो भाविकांच्या साक्षीनं जुलै २००३ रोजी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सर्वाधक प्रेक्षणीय, धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

सी. डी. मध्ये प्रामुख्याने कुंभमेळा सोहळा, नाशिक व त्र्यंबकेश्वर ह्या धार्मिक क्षेत्रांची विस्तृत माहिती आहे.
कुंभमेळा ह्या विभागात कुंभमेळयाविषयी पौराणिक कथा, इतिहास तसेच वैशिष्टयपूर्ण माहिती तत्संबधी छायाचित्रांसह आपणास या सी.डी मध्ये मिळतील. कार्यक्रम सूचीद्वारे नाशिक, त्र्यंबक येथील कुंभमेळया दरम्यान होणाऱ्या शाही स्नानाच्या तारखा तिथींसकट दिलेल्या आहेत. कुंभाची दंतकथा, कुंभमेळयाचा इतिहास, कुंभमेळयाविषयी निरीक्षणे व दृष्टिकोन, साधू संन्यासी यांच्याविषयी माहिती, कुंभमेळयात केले जाणारे धार्मिक विधी त्यांचे महत्व या संदर्भात माहिती दिलेली आहे. कुंभमेळयाच्या सोहळयाचे परिपूर्ण वेळापत्रक तसेच भविष्यात भरणारे कुंभमेळे याची माहिती देखिल उपलब्ध आहे.

नाशिक, त्र्यंबक या शहराचा इतिहास, तेथील भौगोलिक स्थिती, मंदिरे, पर्यटन स्थळे यांची इत्यंभूत माहिती या सी.डी मध्ये मिळते. नाशिक-त्र्यंबक या शहरांची दाखविलेली चलचित्रे हे या सी.डी चे आकर्षण ठरले आहे.

सी.डी चे वैशिष्टय म्हणजे तातडीच्या वेळेस यात्रेकरुंची / प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरिता आवश्यक ते इस्पितळ, पोलिस यंत्रणा, धार्मिक विधींकरिता पुरोहित, रेल्वे व बस गाडयांचे वेळापत्रक, उपहारगृह तसेच धर्मशाळा इ.चे दूरध्वनी क्रमांक आणि पत्ते उपलब्ध करुन दिलेले आहे.

संपूर्ण सी.डी ची संकल्पना व मांडणी उच्च तंत्रज्ञान वापरून तयार केली आहे. सी.डी.तली माहिती इंग्रजी व मराठी ह्या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. आकर्षक रेखाटने छायाचित्रे, चलचित्रे, ध्वनीफित ह्यांच्या कल्पक वापरांमुळे सी.डी. अत्यंत आकर्षक तसेच त्यातील माहितीमुळे सर्वोत्कृष्ट मार्गदर्शक ठरली आहे. अशा ह्या मार्गदर्शनपर सी.डी.ची किंमत फक्त २५० रू. आहे. आपल्याला सी.डी. हवी असल्यास खालील पत्त्यावर संपर्क साधा.

आमचा पत्ता

२०५, अमर आर्केड, कुलकर्णी कॉलनी,
शरणपूर रोड, नाशिक – ४२२००२
महाराष्ट्र, भारत
किंमत- रूपये २५०/-