मुक्तांगण

 

मराठीवर्ल्डच्या वाचकवृंदानी पाठवलेले साहित्य

नमस्कार,
मराठी वर्ल्ड.कॉमला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाचे खरे मानकरी तुम्ही मराठी रसिक मंडळी आहात. तुमच्या ह्या उत्साहाच्या कक्षा रूंदावण्यासाठीच आम्ही तुम्हा सर्वांना खालील ‘सदरांमध्ये’ सहभागी करु इच्छितो. आपला सहभाग स्वागतार्ह आहे.

१) मुक्तांगण :

आपल्या घरात, मित्रमंडळीत घडणा-या अनेक गोष्टी असतात. अनुभव तसेच सल्ले पण असतात. मुक्तांगणद्वारे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना, आप्तांना ह्यात सहभागी करून घेऊ शकता.

प्रत्यक्ष भेटी केव्हा होतील हे सांगता येत नाही तरी मराठी वर्ल्ड च्या सहाय्याने तुम्ही तुमचे विचार, अनुभव मराठीवर्ल्ड परिवारासाठी पाठवू शकता.

तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी मराठी भाषेशी व संस्कृतीशी असलेली नाळ तुटली गेली नाही-जाऊच शकत नाही. मुक्तांगण द्वारे तुम्ही पुन्हा एकदा मराठी मातीशी जोडले जाल.

तुमचे साहित्य, विचार ह्यांना आम्ही निश्चित प्रसिध्दी देऊ. परदेशी असलेल्या बांधवांकडून तेथे होणाऱ्या सभा समारंभ आणि संमेलनाची माहितीची अपेक्षा करत आहोत.

२) शुभेच्छा पत्र :
तुमच्या रचना तुम्ही मराठीवर्ल्डला जरुर पाठवा त्याला आम्ही योग्य चित्रांसकट प्रसिध्दी देऊ

३) शुभेच्छा डिझाईन्स / Flash डिझाईन्स :
हौशी कलाकारांसाठी सुवर्णसंधी. तुमचे डिझाईन्स तुम्ही आमच्याकडे पाठवल्यास आम्ही योग्य ती प्रसिध्दी देऊ. सदर डिझाईन्स ५००x ३०० pixels ह्या मापात पाठवावीत. डिझाईन्स ‘KB’ मध्ये जास्त नसावीत.

४) तुमच्या पाककृती :
मराठीवर्ल्डचे ‘अन्न हे पूर्ण ब्रम्ह’ हा विभाग अधिक समृध्द करण्यासाठी आपण आपल्या नाविन्यपूर्ण पाककृती आमच्याकडे पाठवू शकता. ह्या पाककृती शक्यतो ‘महाराष्ट्रीयन’ असण्याकडे आपला कल असावा योग्य पाककृतीस आम्ही जरूर प्रसिध्दी देऊ.
आम्ही योग्य साहित्यास जरूर प्रसिध्दी देऊ.

चला तर मग बसा लेखणी सरसावून.
आम्ही तुम्हाला सहभागी करुन घ्यायला उत्सुक आहोत.

– सौ. भाग्यश्री केंगे, संपादक

टीप :
१) तुमचे साहित्य ई-मेल ने पाठवायचे असल्यास mweditor@marathiworld.com येथे पाठवावे.
Font ची अडचण असल्यास आपले साहित्य Scan करून image ईमेल ने पाठवावी.
File ची size 5 mb पेक्षा जास्त नसावे. तसेच ते zip करुन पाठवल्यास अधिक चांगले.
२) पाठवलेले साहित्य परत केले जाणार नाही.
३) वेबसाईटवर प्रसिध्द करण्याचा अंतिम निर्णय मराठीवर्ल्ड.कॅम संपादकांचा राहील.