मोहिली धबधबा

भ्रमंती - धबधबे मुख्यपान

 
 

पावसाळ्यात  उंच डोंगरमाथ्यावरून  कोसळणारे  पांढरेशुभ्र  धबधबे पाहण हे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव असतो. कर्जत तालुक्याला निसर्गाने "मोहिली धबधबा " हे  देणं दिलं आहे.

मोहिली धबधबा हा कर्जत पासून ६ ते ७ कि. मि लांब आहे. उल्हास नदी पार करून प्रत्यक्ष मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा   वारा , हिरवीगार वनराई, तेथून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग  असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते . डोंगरमाथ्यावरून मुंबई - पुणे रेल्वेचा रस्ताही दिसतो . धबधब्याजवळ पर्यटकांची हॉटेल्स आहेत. मोहिली धबध्ब्याजवळ थंड वातावरणात गरम -गरम  वाफाळता चहा आणि  मक्याची कणसे खाण्याची मजाच काही और आहे असे इथे येणारे पर्यटक सांगतात. यापुढे ७ -८ कि.मी दूर गेल्यास कोंडाणा परिसरातही अनेक धबधबे आहेत .

कसे जाल ?
नाशिकहून कल्याणमार्गे  कर्जतला जावे. कर्जत स्टेशनवरून  श्रीराम पुलावरून रिक्षाने  मोहलीकडे जाता येते. स्वतःचे वाहन असेल तर अधिक सोयीचे 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा