मोड आलेल्या मेथींची खिचडी

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - १ वाटी मेथी, ३ वाटया तांदुळ, कांदा, कोथिंबीर, मिरची, आले, लसूण, गोडा मसाला, तेल, मीठ, हिंग, हळद, तिखट, ओले खोबरे, चवीपुरती साखर

कृती - मेथीत भिजत टाका. रात्रभर भिजल्यावर सकाळी ती उपसावी व फडक्यात बांधून ठेवावी. त्याला मोड येऊन द्यावेत. तांदूळ धुवून उपसून ठेवावेत. उपसलेले तांदूळ बदामी रंगावर भाजून घ्यावेत. कांदा बारीक चिरून थोडया तेलावर भाजून घ्यावा. या कांद्यामध्ये मोड आलेली मेथी घालून चांगली परतून घ्यावी. कांदा व मेथीच्या मिश्रणात कोथिंबीर, मिरची, आले, लसूण याचे वाटण लावून पुन्हा परतून घ्यावे. मिश्रण चांगले परतल्यावर त्यात पाणी घालावे. साधारणपणे चार वाटी जिन्नसाला ६ ते ८ वाटया पाणी लागते. गॅसवर हे मिश्रण शिजत असताना त्यात गोडा मसाला, हिंग, हळद, तिखट, मीठ तसेच चवीला साखर घालावी. पाण्याला चांगली उकळी फुटल्यावर त्यात भाजलेले तांदूळ हलकेच सोडावेत. खिचडी शिजल्यावर खायला देतांना त्यावर ओले खोबरे व कोथिंबीर पसरून द्यावी.

टीप - हिवाळयात ही खिचडी खावी. पोटाचे विकार दूर होतात. अत्यंत पौष्टिक व रुचकर असा हा पदार्थ आहे. बाळंतिणीकरिता एक चांगला आहार आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा