हास्य कॉर्नर मुख्यपान

गुदगुल्या

शिपाई चोरास : खबरदार... एक जरी पाऊल पुढे टाकलस तर जेल मध्ये टाकेन.
चोर : जाऊ दे मग मी दोन पावलं टाकतो.
- अक्षय

 

मुलगा : आई घरात एक काळी मांजर सारखी फिरते ग...
आई : फिरू दे की, चांगलं असतं.
मुलगा : आई मग तू ताईला नेहमी का दोष देते.
- गौरव उगले

 

सरदार : मला तुझ्याशी लग्न करायचय.
मंजू : पण मी तुझ्या पेक्षा एक वर्षानी मोठी आहे.
सरदार : ठिक आहे आपण पुढच्या वर्षी करू.
- विनोद

 

न्यायाधीश : तु रामलालच्या दुकानातला महागडा हार चोरला आहे की नाही?
चोर : हो, पण त्यात माझी चूक नाही कारण त्या हाराखालील पाटीवर लिहीले होते की,
'हि सुवर्णसंधी दवडू नका !'
- प्रकाश उखाडे

 

एक बाई डॉक्टरांना : डॉक्टर मला अलिकडे कमी दिसायला लागलय.
डॉक्टर : मग पलिकडे बघ.
- गौरव उगले

 

शिक्षक : रोहित उशीरा आलास तर परीक्षेला बसू देणार नाही.
रोहित : ठिक आहे सर.... मी उभा राहून पेपर लिहीन.
- संजय गवळी

 

पती : माझ्याशी एक तरी शब्द गोड बोल.
पत्नी : मध, साखर, गुळ.
- विश्वेश जोशी

 

गुरूजी :एकदा गुरूजी हिमालयाची माहिती सांगतात व मुलांना प्रश्न विचारतात. हिमालय पर्वत नसता तर?
विद्यार्थी : गुरूजी तुम्हाला हिमालयावर एवढं बोलाव लागल नसत.
- गौरव उगले

 

जेलर कैदयास : बोल फाशी पुर्वी तुझी काय इच्छा आहे?
कैदी : मला ताजे आंबे खायचे आहेत!
जेलर : अरे बापरे म्हणजे आजून सहा महिने थांबावे लागेल.
कैदी : काही हरकत नाही, मी थांबतो ना !
- प्रकाश उखाडे

 

भविष्यकार : या मॅडम तुमच्या प्रियकराचं भविष्य जाणून घ्या.
मुलगी : ते तर माझ्याच हातात आहे.
- प्रकाश उखाडे

 

गुरूजी : मुलांनो 'मी कंपनीचा मॅनेजर झालो तर..' निबंध लिहा.
प्रमोद तु का लिहीत नाहीस?
प्रमोद : सर मी माझ्या सेक्रेटरीची वाट पहातोय.
- अक्षय जानोरकर

 

गुरूजींनी क्रिकेटच्या सामण्याचे वर्णन लिहायला सांगीतले होते. एका मुलाने लिहीले पाऊस पडल्याने सामना झालाच नाही. गुरुजींनी
तपासतांना पेपरवर लिहीले no match no marks.
- अक्षय जानोरकर

 

मुलगा : काय ग आई तु कधी सर्कस मध्ये होतीस का?
आई : नाही रे बेटा.
मुलगा : मग शेजारच्या काकू का म्हणतात की, तु बाबांना बोटावर नाचवतेस म्हणून.
- गौरव आनंद

 

शिक्षक : काय रे राजु,
तु परिक्षेत पास झालास की तुझे बाबा तुला सायकल घेऊन देणार होते ना,मग तु नापास
का झालास?
सर : त्याच काय आहे ना सर, मी सायकल चालवायला शिकत होतो ना म्हणून.
- भुषण खाडगीर

 

डॉक्टर त्यांच्या मित्रास : सध्या माझ्याकडे पेशंट कमी यायला लागली आहेत.
मित्र : कशी येणार बरोबर आहे. अरे बाहेर बोर्डच तसा लिहीला आहे ना,'येथून वर जाण्याचा रस्ता आहे.'
- गौरव उगले

 

पत्नी : आमच्या ह्यांना वाचवणारे तुम्हीच का?
व्यक्ती : हो मीच.
पत्नी : आमच्या ह्यांची टोपी कुठय.
- सुमीत जोशी

 

पत्रकार पक्षश्रेष्ठीस : जर एखादा व्यक्ती तुमचा पक्ष सोडून गेला, तर तुम्ही त्यास काय म्हणाल.
पक्षश्रेष्ठी : फितुर
पत्रकार : एखादा व्यक्ती दुसरा पक्ष सोडून तुमच्यात समाविष्ट झाला तर त्याला.
पक्षश्रेष्ठी : 'ह्रदय परीवर्तन'
- भूषण भोपळे

टिप : हास्यकॉर्नर मधील मजकूरास मराठीवर्ल्ड सहमत असेलच असे नाही.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा