कला - लेख मुख्यपान

 

 

वारली चित्रकला


 ठाणे जिल्ह्यातील वारली आदिवासींची चित्रकला ही त्यांच्या आयुष्याचं एक अविभाज्य अंग आहे. एक सहजगत्या उमलणारी  भावाभिव्यक्ति आहे. भोळया भाबडया आदिवासींच्या खडतर आयुष्यातला तो एक आनंदाचा क्षण आहे. त्यांचं वेगळं जग, रीतीरिवाज, सण,  उत्सव, दैनंदिन जीवनातील अनेक प्रसंग नकळत हळुवारपणे त्यांच्या कुडाच्या भिंतींवर साकार होत जातात. गावात एखादं लग्न ठरलं की पंचक्रोशीतले लहान मोठे पुरूष-स्त्री चित्रकार उत्स्फूर्त भावनेने जमा होतात. मोठया उत्साहानं सारी घरं रंगवून टाकतात.  असं त्यांचं जगणं आहे. रानफुलासारखं, निखळ नि मोकळं.  त्यांनी रंगवलेलं प्रत्येक चित्र हे त्यांच्या भाबडया मनावर उमटलेलं त्यांचं स्वत:चं जग आहे. ही सारी संवेदनाक्षम मनाची प्रतिक्षिप्त  क्रिया आहे. शेणा-मातीनं सारवलेल्या कुडाच्या भिंतीवर तांदळाच्या पेजेनं रंगवण्याचा त्यांचा आनंद अगदी पूर्वापारचा आहे. त्यात त्यांचं नृत्य, लग्न, वरात आहे. नारळाची, ताडीची झाडं आहेत, शेतं आहेत आणि... मोहानं भरलेली माणसंही आहेत. एक विशिष्ट प्रकारची अमूर्तवादी चित्रं इथं आपल्याला आढळतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा