गोळा भात

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - ४ वाटया तांदूळ, २ वाटया चणादाळ, चवीनुसार तिखट-मीठ, धने-जिरे पूड २-२ चहाचे चमचे, २ चहाचे चमचे गरम मसाला, दोन मुठी धुवून चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी २ मोठे डाव गोडेतेल, मोहरी, हिंग व हळद प्रत्येकी १ चहाचा चमचा व ४-५ सुक्या लाल मिरच्या.

कृती - रात्री हरभर्‍याची डाळ पाण्यात भिजत घालावी. सकाळी ती वाटून घ्यावी. नंतर त्यात कोथिंबीर तिखट, मीठ, धने-जिरे पूड गरम मसाला घालावा. सर्व मिश्रण चांगले कालवून सुपारीपेक्षा थोडे मोठे गोळे करावेत व प्रेशरकुकरमध्ये चाळणीवर ठेवून वाफवून घ्यावेत. नेहमीप्रमाणे साधा भात करून घ्यावा. प्रत्येकाला पानावर भात वाढला की त्यावर हे २-४ गोळे घालावेत. गोळे भातात कुसकरून घ्यावेत. नंतर जास्त तेलाची हिंग-मोहरीची फोडणी करावी. फोडणीत सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घालावे. नंतर ही फोडणी प्रत्येकाच्या भातावर चमच्याने वाढावी.

टीप - ह्या भाताबरोबर दुसर्‍या कुठल्याही तोंडीलावण्याची जरूर भासत नाही. हरभर्‍याची डाळ जरा रवाळ दळून आणल्यास त्या पिठाचे गोळे करून भात करता येतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा