नदी/तलाव मुख्यपान

रंकाळा तलाव

कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिमेकडील 'रंकाळा तलाव' ही संध्याकाळी फिरण्याची मनोरंजक जागा लोकप्रिय आहे. छत्रपती शाहू महाराजांनी हे सरोवर बांधले. चौपाटी व इतर बागांनी हे सरोवर वेढले आहे. रंकाळयाच्या पार्श्वभूमीला ऐटबाज शालीनी महाल उभा आहे. महाराष्ट्रातील एकमेव 'स्टार रेटेड हॉटेल' म्हणजे शालीनी पॅलेस होय. रंकाळा आणि चौपाटी म्हटलं की, चटकदार भेळपूरी, रगडा पॅटीस आणि निरनिराळे चमचमीत पदार्थ आठवल्याशिवाय राहात नाही. चित्रपट उद्योगाचे एक केंद्र म्हणून पूर्वी कोल्हापूर प्रसिध्द होते. कोल्हापूरच्या स्टुडियोमधे अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. रंकाळा सरोवरावरील 'शांत-किरण' स्टुडियो अनेक चित्रपटांच्या चौकटीत पकडला गेला आहे. भारतीय चित्रपटाला हा स्टुडियो म्हणजे एक अनमोल भेट होय. व्ही (वणकुद्रे) शांताराम हे या स्टुडियोचे मालक होते. इतिहासातील ते कलेचे दिवस म्हणजे, आजच्या सोनेरी स्मृती आहेत.

इ. सनाच्या ७५० ते ८५० व्या शतकामधे, ऐतिहासिक घटनांची साक्ष असलेली ही जागा, आधी एक काळया पाषाणाची भली मोठी खाण होती. इ. सन. ८०० ते ९०० मधे झालेल्या भूकंपामुळे या खाणीच्या नैसर्गिक संरचनेत बदल घडला. यांतील मोठया विवरातून भूमीगत पाणी साठू लागले. महालक्ष्मी मंदिरापासून अर्धा किमी. अंतरावरील एक भव्य कलाकृती म्हणजे, 'रंकाळा' तळे होय. इतिहासात या तळयाला सर्वाधिक महत्त्व मिळाले असून, या सर्वात जुन्या तळयापाशी, भव्य नंदीचे देऊळ आहे. 'संध्यामठा'ची बांधणी याच तळयाकाठी झाली. नंदीची प्रतिमा विशाल आणि दुर्मिळ आहे. या तळयाच्या उत्तरेस शालीनी पॅलेस तर तळयाच्या नैऋत्य दिशेस 'पद्माराजे उद्यान' आहे. एक चित्रसदृश विलोभनीयता हया तळयास लाभली असून, तळयाच्या काठाने पाय मोकळे करण्याचा अनुभव आनंददायी आहे. थेट जलसान्निध्याचा अनुभव हा राजघाट व मराठाघाट येथून घेता येतो. राजघाटावर एक मनोरा आहे. हया मनो-यासमोरच शालीनी महाल व अंबाई तरण तलाव आहे. सिनेमा चित्रीकरणासाठी हे स्थान प्रसिध्द आहे. पावसाळयात, तळयातील संध्यामठ हा अधिकांश काळ पाण्यात असतो.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF