मंदिरे/तीर्थक्षेत्रे मुख्यपान

काशी विश्वेश्वर मंदिर

करवीर माहात्म्याच्या संरचनेच्या आधीपासून हे मंदिर उभे आहे. महालक्ष्मी मंदिराच्या उत्तरेस, 'घाटी दरवाज्या'च्या परिसरात ते आहे. काशी विश्वेश्वर म्हणजेच लिंग प्रतिमेतील शिव होय. अगस्ती ऋषी, लोपामुद्रा, राजा प्रह्लाद, राजा इंद्रसेन, यांनी या मंदिरास भेट दिली असल्याचा उल्लेख 'करवीर माहात्म्या'मधे सापडतो. या मंदिराच्या बांधणीच्या आधी त्या जागेवर 'काशी' आणि 'मन कर्णिका' ही दोन पावन कुंडे होती. त्यापैकी 'मन कर्णिके'तील पाणी आता आटले असून, महापालिकेने त्यावर १९६२ सालामधे 'महालक्ष्मी उद्दयान' उभे केले. काशी कुंडाची सद्यस्थिती अतिशय दयनीय आहे. मंदिराचा गाभार हा १० चौरस फूट आहे. बाहेरील लहान मंडपात ध्यान-धारणेसाठी एक गुहा असून, ती फार पुरातन आहे, असे म्हटले जाते. प्रवेशद्वारापाशी गणपती, तुळशी इ. देवतांच्या मूर्ती आहेत. या देवळाच्या लगतच जोतिबाचे छोटेखानी देऊळ आहे. हे मंदिर, इसवी सनाच्या ६ व्या ते ७ व्या शतकामधे बांधले असावे. राजा गंध्वाधिक्षाने या मंदिराचा विस्तार केला. घाटी दरवाजा, कार्तिक स्वामी, नवग्रह मंदिर, शेषवर्मा, इ. याच कालावधीशी नाते सांगतात.

पुण्य-भू बाहूबली

३०० वर्षांपूर्वी महान साधक बाहूबलींनी ज्या जागी तपाचरण केले होते, तिथे ऋषी बाहूबलींच्या नावाने १९३५ साली एक 'सेलेबसी रिसॉर्ट' बांधण्यात आले. चार मनोऱ्यांची संगत असलेली त्यांची समाधी येथे आहे. गुरूदेव, सामंत भद्र महाराज १०८ वे यांच्या मार्गदर्शनाखाली, ७५ वर्षांपूर्वी, अनेक रिसॉर्टस् व शाळा बांधण्यात आल्या.

मूळनायक : भगवान बाहूबली यांची श्वेत-मूर्ती, ही जवळपास ८५० सेमी. उंच असून खड्गासनातील आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी : हे तीर्थ म्हणजे, अनेक तपस्व्यांची तपोभूमी आहे. दिगंबर सन्यास्यांच्या नुसार हे क्षेत्र एक 'अतिशय क्षेत्र' आहे. ३५० वर्षांपूर्वी, महान व ज्ञानी आचार्य, सामंतभद्रजी महाराज साहेब यांनी हया जागी अतिशय उग्र तपश्चर्या केली. हया टेकडीवर प्राचीन मंदिरे आहेत. पण सामंतभद्रजी महाराज साहेबांच्या धर्मकारणाच्या विद्यमाने बाहूबलींच्या नव्या मूर्तीची अलिकडेच प्रतिष्ठापना झाली.

इतर मंदिरे : हया मंदिराच्या आवारात कलात्मकतेने व सौंदर्यपूर्ण रीतीने बनविलेल्या सिध्दक्षेत्र आणि सामोवसरण यांच्या भव्य तसेच मनमोहक प्रतिकृती आहेत. हया टेकडीवर श्वेतांबर तसेच दिगंबर मंदिर आहे.

कला व शिल्पाकृती : जंगलातील टेकडयांनी वेढलेल्या हया परिसरातले हे मंदिर फारच सुंदर व रमणीय आहे. बाहूबलीची मूर्ती व प्रवेशद्वारावरील दोन गज-आकृती हया भव्य आणि विलोभनीय आहेत. समावोसरणांच्या रचनेतून कलात्मक कौशल्य प्रतीत होते. हया मंदिराला भेट देणा-या उपासकांचे हृदय भक्तीने उचंबळून येते.

kolhapurdistrict.org च्या सौजन्याने

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF