मंदिरे/तीर्थक्षेत्रे मुख्यपान

 

जटायूचे मंदिर : टाकेद

भारतीय संस्कृती माणसाप्रमाणेच इतर सर्व प्राणी,पक्षी यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानते.तसेच त्यांना योग्य सन्मान दिला असून त्यांचे पुजनही केले आहे.रामायणातील जटायूच्या कथेमध्ये हेच महत्त्वाचे तत्त्व दाखवलेले आहे.सीताहरण आणि जटायू ही कथा रामायणातील एक प्रसिद्ध कथा समजली जाते.सीतेचे अपहरण करून रावण तिला आकाशमार्गे घेऊन जात असताना गिधाड असलेला हा जटायू पक्षी रावणाच्या मार्गात आडवा आला आणि त्याने रावणाला विरोध केला.रावणाने त्याचे पंख कापुन टाकले तेव्हा जटायू जमिनीवर कोसळला आणि रामचंद्राची वाट पाहत थांबला होता. सीतेला शोधत प्रभू रामचंद्र इथे आले असता त्याने रामाला ही सीताहरणाची घटना सविस्तर सांगितली.प्रभु रामचंद्रानी याच ठिकाणी जमिनीत एक बाण मारला आणि त्यातून निर्माण झालेले पाणी जटायूला पाजले.ते प्यायल्यावर जटायूने आपले प्राण रामाच्या मांडीवरच सोडले.

रामायणातली ही जटायूची कथा ज्या ठिकाणी घडली आहे ते स्थान म्हणजे नाशिक जिल्हाल्यामधील टाकेदतीर्थ हे आहे.येथे पक्षी रूपातील जटायूसुद्धा देवत्व प्रगट करून गेला आहे.नाशिकवरून इगतपुरी घोटीमार्गे टाकेदचे अंतर ४७ कि.मी आहे.जटायूमुळे हे टाकेद तीर्थ पावन झाले आहे. नाशिकपासून जवळच असलेले हे ठिकाण आहे. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रानी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे.त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात.

 

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF