गुहा/लेंणी मुख्यपान

अश्मयुगीन चित्रशालेचा अनमोल ठेवा

अमरावती येथील सहा हौशी  निसर्ग संशोधकांनी महाराष्ट्र आणि  मध्य प्रदेशाच्या  सीमेवरील  सातपुडा  पर्वतात  १५ ते २० हजार वर्षापूर्वीच्या तबल  १८ अश्मयुगीन गुहचित्रांचा शोध  लावला  आहे. या संशोधन  कार्याची भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने विशेष  दखल घेतली आहे. अमरावतीपासून  सुमारे ८५ कि.मी अंतरावर , मोर्शी  ते चांदूरबाजार चिखली सावंगीमार्गे धारूर  गावाजवळून दिसणा-या  सातपुडा पर्वतावर  सर्वात  उंचीवर असलेल्या  मुंग्सादेव  या १४३ फूट X २५ फूट रुंद आणि  तेवढीच  उंची असलेल्या  गुहेत प्रचंड  शिलेवर अश्मयुगीन  चित्रे  काढलेली  आहेत .

डॉ. व्ही. टी. इंगोले, वन्यजीव लेखक प्र. सु. हिरुरकर, कुमार पाटील, ज्ञा.आ.दमाहे, पद्माकर लाड, डॉ. मनोहर खोडे  या ६ ज्येष्ठ पुरातत्व संशोधकांनी गुहाचित्रांचा शोध लावला. यात वाघ, हत्ती, जिराफ, गेंडा, रानगवे, सांबर, अस्वले, वानर, रानकुत्रे ह्यांची चित्रे आहेत. गिधाड या पक्षाचे एकमेव चित्र गेरुसारख्या लाल रंगात साकारले आहे. एवढेच नव्हे तर, एका  गुहेत फांदीवर झोके घेणा-या आदिमानवाचे चित्रही   काढलेले आहे. या मानवाचे पाय मात्र  वानरांच्या पंज्यासारखे दाखवले आहेत. जवळपास ७०-८० फूट रुंद आणि ४० फूट उंचीच्या धनुष्यबाणा सारख्या अर्धगोलाकार शीलेवरील चित्रं हे वैशिष्टय आहे. हे तळापासून ४ फूट उंचीवर डावीकडून  उजवीकडे  विशिष्ट  अंतरावर  निर्माण केले आहे.

अभ्यासकांच्या  मते, हिमयुगानंतर  इंडोनेशियाच्या एका बेटावर ज्वालामुखी  जागृत  झाला. त्याची कोट्यावधी टन राख होऊन  जगभर  सर्वत्र  पसरली. जगभरातील  विविध प्राण्यांच्या  जाती  नष्ट झाल्या. दक्षिण अफ्रिकेतील कालहरी  येथील  बुशमन  नावाचा आदिमानवाचा वंश मात्र वाचला. तो जगभर पसरला. भारताचा विचार करता, १९५७ मध्ये  पुराणवस्तू संशोधक डॉ. वाकणकर  यांनी मध्य प्रदेशातील भोपालजवळील 'भीमबेटका' येथे  ७८० गुहाचित्रे शोधली. अश्मायुगापासून ते पूर्वपाषण युगापर्यंतची ही चित्रे आहेत. पूर्वपाषाण  मध्ये  मुखत्वे  प्राण्यांची चित्रे आहे. ही सर्व  लाल रंगात आहेत. मुन्गासादेव  येथे सापडलेली सातपुडा पर्वतरांग भीमबेटकच्या अग्नेयाला  आहे. याचा आकार ३० मीटर  रुंद व १० मीटर उंच आहे. माणसाचा हात पोहचेल इतक्या  उंचीवर ही चित्रे काढली  आहेत प्रत्येक चित्राचा आकार १० ते १५ सेमी  आहे.

अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार भारतीय  उपखंडातील मानवी  जीवनाची सुरुवात विन्ध्य  पर्वतातून  झाली. हा मानव सुरुवातीला  गुहेत रहात होता व नंतर  आश्रयासाठी तो सातपुडा पर्वत रांगा येथे आला. आपण  जगत असलेल्या जीवनशैलीचे  टिपण त्याने  चित्र भाषेत करून येणा-या पिढीला त्याबाबत  अवगत  केले आहे . मानवी अभिव्यक्तीचा हा  सर्वात  जुना ठेवा आहे. महाराष्ट्रसाठी हे सुवर्ण  महोत्सवी  वर्षात लाभलेले सोनेरी संचित  आहे असे  म्हणावे  लागेल.

हजारो वर्षापूर्वी अशमयुगातील आदिमानव समूहाने पर्वतावरील गुहेत राहायचा. तो शिकार करून व कंदमुळे खाऊन जगायचा. धोकादायक प्राणी कोणता  व उपयुक्त कोणता  याचे ज्ञान समूहातील  तरुणांना ह्यासाठी शिक्षण  व संवादाचे साधन म्हणून  या गुहाचित्रांचा वापर  होत  असावा  असे तज्ञांचे मत आहे .भारतात अशा  प्रकारचे गुहाचित्रे  मध्य  प्रदेशातील  भीमबेटका  येथे  आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF