MarathiWorld - Home
About Us About Marathi World Suggest a site Feedback Contact Site Map
राशिभविष्य - जुलै - २००९
एस. जी. अकोलकर

भरीव कामगिरी
पराक्रमातील रवि- बुधाचा लाभातील गुरूशी होणारा त्रिकोण तुम्हाला भलत्याच उंचीवर नेऊन ठेवील असे दिसते. हातुन काहीतरी भरीव कामगिरी घडेल. लोकांमध्ये त्याचे कौतुक होईल. प्रतिठित भर पडेल. तरूणांना हॉस्पिटॅलिटी, केटरींग, ऑटोमोबाईल्स या क्षेत्रात प्रवेश मिळेल व चांगल्यापैकी पैसाही हाती येईल. महिलांना संगीत, गायन व नृत्य या क्षेत्रात नैपुण्य दाखवता येईल. तरूणांना नात्यातल्या ओळखीतून देखण्या व्यक्तींची स्थळे येतील.
अनुकूल :- २,६,१६,२६
प्रतिकूल :- ४,१४

शब्दाला वजन
रवि-बुध आणि गुरूचा त्रिकोण व्यवसाय स्थानातून होत आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रात दबदबा वाढेल व तुमच्या शब्दांना खूपच वजन प्राप्त होईल. इतरांना तुम्ही दिलेल्या सल्ल्याचे महत्व कळून येईल. मोबाईल,कायदा,कोर्ट,बँक या क्षेत्रात तरूणांना जास्त वाव मिळेल. महिलांच्या जीवनात सुंदर दिसण्याला वेगळेच महत्व येईल व त्यासाठी त्या नवनव्या युक्त्या शोधून काढतील. तरूणांच्या प्रेमजीवनात वेगाने काही हालचाली होतील.
अनुकूल :- ४,१४,१९,२६
प्रतिकूल :- ७,१६
मनोव्यथांचा सामना
राशीस्वामी सूर्यासह राशीवरच असल्याने बुध्दी तल्लखपणे काम करतील शरीरप्रकृतीही चांगली राहील. परंतू व्ययातील मंगळाचे भ्रमण अत्यंत प्रतिकूल आहे. त्यामुळे काही मनोव्यथांना सामोरे जावे लागेल. घरातल्या आजारपणांसाठी खर्च होईल. महिलांच्या हौसेपायी विलासाच्या वस्तूंवर अवास्तव खर्च होऊ शकेल. कार्यालयात वरिष्ठांकडून फारशी सन्मानाची वागणूक मिळणार नाही. तरूणांनी चैनी मित्रांची संगत सोडावी व मनावर संयम ठेवावा.
अनुकूल :- २,७,१६,२०
प्रतिकूल :-
१०,१८

प्रयत्नांवर भिस्त
गुरूची प्रतिकूलता संपूर्ण महिनाभर आहे. त्यामुळे नशिबाची साथ कमी मिळेल. स्वत:च्या प्रयत्नांवरच जास्त भिस्त ठेवावी लागेल. तरूणांच्या उच्च शिक्षणाच्या सर्वच अपेक्षा पूर्ण होऊ शकणार नाहीत. गुणही अपेक्षेपेक्षा कमी मिळतील. त्यामुळे जे विषय कठिण वाटतात त्यासाठी गाईड, शिकवण्या यांची मदत घ्यावी. घरात वडिलधार्‍या माणसांच्या प्रकृतीत महिलांनी जास्त काळजी घ्यावी. आलेल्या स्थळांच्या बाबतीत शिक्षणाची कमतरता जाणवेल.
अनुकूल :- ५,१५,१८,२३
प्रतिकूल :- ११,२०

युक्तिवादाचा यशस्वी वापर
आपल्या आदर्शवादी विचारसरणीला पोषक असेच वातावरण आहे. तुमचे विचार संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी व्हाल. प्रभावी युक्तिवाद राजकारणातही उपकारक ठरणार आहे. कलाक्षेत्रात नवीन प्रकल्प हाती घ्यायला हरकत नाही. तरूणांना ऑटोमोबाईल व पंचताराकिंत हॉटेलसंबंधी क्षेत्रे जास्त आकर्षित वाटतील. महिलांना वक्तृत्वगुण जोपासण्याची संधी मिळेल. नवे भावबंध जुळतील.
अनुकूल :- ७,१२,२५,२८
प्रतिकूल :- १४,२२

जागेबाबत मतभेद
दशमातील स्वगृहीच्या राशीस्वामीमुळे कार्यालयात उच्च दर्जाची कार्यक्षमता राखणे सोपे जाईल. वरिष्ठांकडूनही कौतुक होईल. हाताखालचे कर्मचारी मात्र तुमच्या चागुलपणाचा जास्त फायदा घेणार नाहीत यादृष्टीने सावध रहा. राहती जागा किंवा नवीन घर खरेदी याबाबत पति-पत्नींची मते न जुळण्याचा संभव आहे. तरूणांना उंची तयार कपडे, म्युझिक सिस्टिम्स्, होम थिएटर इ. क्षेत्रात संधी जास्त येतील. गावाकडची स्थळे पसंत पडण्यात अडचणी येतील.
अनुकूल :- ४,१५,१९,२६
प्रतिकूल :- १६,२५

स्पर्धा परीक्षात यश
उत्कर्षाच्या अनेक संधी येणार आहेत. आपल्या क्षेत्रातील कौशल्य व व्यासंग अद्ययावत ठेवला तरच त्यांचा फायदा उठवता येईल. शासकीय सेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश मिळू शकेल. एकूणच स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर भर द्यावा. कार्यालयात उत्तरार्धात काही प्रश्न उपस्थित होतील. तुमच्या नव्या कार्यपध्दतीच्या सूचनांना जुन्या मंडळींकडून विरोध होऊ शकेल. मुलांची प्रगती वरच्या दर्जाची राहील. तरूण शारीरिक आकर्षणाच्या जास्त आहारी जातील.
अनुकूल :- २,७,१७,२८
प्रतिकूल :- १८,२७

उत्कट प्रतिसाद
आपण काहीतरी पराक्रम गाजवावा व त्याचे कौतुक करण्यासाठी कुणाच्या तरी नेत्रात पंचारतीच्या ज्योती दिसाव्यात अशी तुमची सतत अपेक्षा असते. ही अपेक्षा या महिन्यात सर्वार्थांने पूर्ण होण्याचा योग दिसतो. तुमच्या प्रेमाला जोडीदाराकडून तेवढाच उत्कट प्रतिसाद मिळेल. विवाहितांच्या सुखद क्षणांच्या आठवणींना उजाळा मिळेल. कार्यालयात ज्येष्ठांशी संवाद साधणे महत्वाचे आहे. तरूणांनी सतत आपल्या क्षेत्रातल्या नव्या घडामोडींशी संपर्क ठेवावा.
अनुकूल :- ५,१५,१९,२६
प्रतिकूल :- ३,१९

समविचाराचा जोडीदार
महिन्याचा पूर्वार्ध जास्त अनुकूल आहे. आपले म्हणणे युक्तिवाद करून लोकांना पटवून देणे चांगले जमेल. याचा फायदा मार्केटिंगच्या क्षेत्रात करून घेता येईल. भागीदारीचाही एखाद दुसरा प्रस्ताव येणे शक्य आहे. शासनाकडे सादर केलेल्या निविदा संमत होतील. कार्यालयात स्त्रीपुरूषांच्या मैत्रीचा विचित्र अर्थ लावला जाईल किंवा तुमच्या कामाला उरक कमी आहे असा आरोप होईल. तरूणांना आपल्या विचारांशी मिळता जुळता, प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा जोडीदार मिळेल.
अनुकूल :- ७,१७,२०,२८
प्रतिकूल :- ४,२३

भटकंतीची मजा
महिन्याचा बराचसा काळ मित्र-मैत्रिणींच्या सहवासात जाणार आहे. पावसाळी सहली, करमणुकीचे कार्यक्रम यांच्यात सतत सहभाग राहील. नाटक,दूरदर्शन मालिका यात प्रवेश करण्यासाठी व तेथे आपले कलागुण प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. स्वतंत्र धंद्यात वसुलीवर भर दिल्यास थकबाकी मिळू शकेल. कार्यालयात शिस्तीचा बडगा उगारल्याने परिश्रम जास्त पडतील. तरूणांची उत्तरार्धात बुध्दिमान व्यक्तींशी ओळख होईल.
अनुकूल :- २,१३,१९,२३
प्रतिकूल :- ६,२५

घरातच रमाल
धनेश व लाभेश गुरू राशीवरच असल्याने आपल्या कुटूंबातच रमण्याची प्रवृतती वाढेल. कार्यालयात वरिष्ठांची वागणूक थोडीशी अरेरावीची वाटल्याने रजा टाकून घरी बसणे पसंत कराल. महिलांचा बराचसा वेळ सणाच्यादृष्टीने घराची सजावट करण्यात किंवा शोभेच्या वस्तू खरेदी करण्यात जाईल. तरूणांना घरातच कार्यालय थाटून काहीतरी जोडधंदा करावासा वाटेल. त्यात सौंदर्य प्रसाधने, स्त्रियांची आभूषणे यांना प्राधान्य दिल्यास फायदा होईल.
अनुकूल :- ६,११,२१,२४
प्रतिकूल :- ९,२७

भावंडांसाठी धावपळ
गुरूची प्रतिकूलता एवढा महिनाभर आहे. त्यामुळे खर्च जास्त होईल. कार्यालयात जास्त कामाचा बोजा अंगावर पडेल व घरगुती करमरंना वेळ देता येणार नाही. भावंडाच्या कामासाठी विशेषत: त्यांची लग्ने जमविण्यासाठी जवळपासच्या गावांचा बराच प्रवास करावा लागेल. महिलांना रमणीय ठिकाणी प्रवासाचे योग आहेत. एखाद्या कला करमणूक प्रकल्पाची जबाबदारी घेण्याचा प्रस्ताव येऊ शकेल. तेथील ओळखी प्रेमात रूपांतरीत होऊ शकतील.
अनुकूल :- ५,१४,१९,२६
प्रतिकूल :- २,१२


श्री. एस. जी. अकोलकर, प्रसिध्द ज्योतिषी व चित्रपट कथा लेखक. हे ह्या क्षेत्रातील जवळपास ३० वर्षांहून अधिक अनुभवी आहेत. गेली १२ वर्षे ते मुंबई सकाळ ह्या महाराष्ट्रातील अग्रमानांकित वृत्तपत्रात स्तंभलेखन करीत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख इ. च्या बाबतीत त्यांनी वर्तवलेली अनेक राजकीय भाकिते यशस्वी झाली आहेत. श्री. अकोलकर यांचा कृष्णमूर्ती पध्दतीचा (नक्षत्रांच्या गणितीवरून मांडलेले आडाखे/सिध्दांत) गाढा अभ्यास आहे.

व्यक्तिगत सल्ल्यासाठी संपर्काचा पत्ता -
श्री. एस जी अकोलकर

बिल्डिंग नंबर - २, ब्लॉक नं २८,
राजेंद्रनगर, दत्तपाडा रोड,
बोरिवली (पूर्व)
मुंबई - ४०००६६
दूरध्वनी - ९१ - २२- २८७०८६००
मोबाईल - ९८६९२२९८४४

ई-मेल - sgakolkar2001@yahoo.co.in, shashi_akolkar@rediffmail.com




 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

   
 
Copyright © 2000 MarathiWorld. All Rights Reserved Worldwide.
Site designed & maintained by
CyberEdge Solutions.