सेवासुविधा मुख्यपान

 

ह्या महिन्याचे राशिभविष्य

राशीभविष्य - मे २०१७

एस. जी. अकोलकर


तूमची बुध्दी सध्या अत्यंत तल्लखपणे काम करीत आहे आणि याचा तुम्हाला अभिमानही आहे. त्यामुळेच कोणी तुमच्या निर्णयाविरोधात मत व्यक्त केले तर तुमचे पित्त खवळते अशा वेळी समोरच्या माणसाची बाजूही नीट ऐकून घ्या. कार्यालयात स्त्री सहकार्‍यांच्या कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याने काही प्रकरणात स्वत: लक्ष घालावे लागेल. महिलांनी वजन कमी करण्यासाठी खास प्रयत्न करावेत. तरूणांना जोडीदाराशी संवाद साधणे थोडे जड जाईल.

अनुकूल - ५, ११, १९, २३ प्रतिकूल - १६, २६


प्रतिकूल ग्रहांची संख्या वाढली आहे. कोणतेही पाऊल उचलतांना खूपच खबरदारी घ्यावी लागेल. फाजील आत्मविश्वासाने कार्यालयात भलत्या सलत्या जबाबदार्‍या अंगावर घेऊ नका. जास्त त्रास निवृत्तीच्या जवळपास पोहचलेल्या सहकार्‍यांकडून होईल. मित्रांचा सहवास दिलासा देणारा ठरेल. महिलांचे लक्ष घरातले आरोग्य राखण्यावर केद्रिंत होईल. तरूणांची नवी मैत्री होईल.

अनुकूल - ४, १२, १६, २६ प्रतिकूल - १८, २८


मंगळ सध्या प्रतिकूल असल्याने फाजील आत्मविश्वासाच्या आहारी जाऊन उगाच भलते सलते काम अंगावर घेऊ नका. कार्यालयात तर विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला देण्यात आलेले काम तुम्ही वेळेच्या मर्यादेत पुर्ण करीत आहात की नाही यावर वरिष्ठांची करडी नजर राहील. शासकीय कर्मचार्‍यांशी उगाच वाद ओढवून घेऊ नका. महिलांना घरातल्या वडीलधार्‍यांना सोबत म्हणून जवळच्या प्रवासाला जावे लागेल. तरूणांनी जिवलगासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करावी.

अनुकूल - ६, १०, १८, २३ प्रतिकूल - ४, २१


दशमेश मंगल लाभस्थानात असल्याने मनातल्या बर्‍याच आकांक्षांची पूर्ती होऊ शकेल. प्लॉट वा फ्लॅटच्या खरेदीसाठी काही वयस्क लोकांची मदत मिळेल. वित्तपुरवठा करणार्‍या संस्थांकडून तुमच्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. कार्यालयातले काही काम घरी बसून करता आल्याने थोडासा निवांतपणा मिळेल. तरूणांना गावातलेच एखादे सुंदर स्थळ येण्याची शक्यता आहे. हवहवेसे पाहुणे अचानक घरी येतील.

अनुकूल - ९, १२, २१, २५ प्रतिकूल - ६, २३


भाग्यस्थानातील रविचा पंचमातील शनीशी होणार्‍या त्रिकोणामुळे सध्याच्या काळात संततीच्या बाबतीत काही ना काही आनंदवार्ता कानावर पडत राहतील. मुलांचे परीक्षांचे निकाल महिलांना सुखावून जातील. उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळणे सुकर होईल व मुलाखतीसाठी आमंत्रणेही येतील. नोकरीच्या निमित्ताने कारखानदार व राजकीय नेत्यांशी जवळीक साधाल. तरूणांची प्रवासात होणारी ओळख फसवी ठरेल.

अनुकूल - ६, १०, २४, २८ प्रतिकूल - ८, २५


सप्तमातला शुक्र म्हणजे सौख्याचा बहर! कोणतेही नाते फुलण्यासाठी परस्परातला संवाद खूपच आवश्यक असतो. तुमच्या वैवाहिक जोडीदाराशी असा संवाद अधिक उत्कटपणे साधू शकाल. एकमेकांच्या सहवासातल्या जुन्या क्षणांची पुन: उजळणी होईल. आपसातल्या नात्यांचे भावबंध अधिक दृढ होतील. भागीदारीच्या व्यवसायात भागीदाराची भूमिका समजून घ्याल. तुमचा कार्यालयातला ताण कमी करतील. तरूणांना आदर्श जोडीदाराचे स्थळ येईल.

अनुकूल - ४, ९, १३, २६ प्रतिकूल - २, ११


कार्यालयात जास्त सत्तेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. उलट वरिष्ठांचे मत तुमच्याबद्दल प्रतिकूल झाल्याने लांबच्या गावी काही दिवस पाठवले जाण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये म्हणून एखाद्या ओळखीच्या शासकीय अधिकार्‍याची मदत घ्या. सुदैवाने मनाचा उत्साह संकटावर मात करण्याचे धैर्य देईल. महिलांना व तरूणांना काही दिवस एकटेपणा सहन करावा लागेल.

अनुकूल - ६, १०, १९, २४ प्रतिकूल - ३, १३


वैवाहिक जीवनात पति - पत्नींना लहान मोठे चढ उतार नेहमीच अनुभवावे लागतात. छोटी मोठी वादळेही घोंगांवून नाहीशी होतात. पण सध्या काळ जरा जास्त कसोटीचा आहे. कुठल्या मुद्यावर वादाला तोंड फुटेल याची काही शाश्वती देता येत नाही. जास्त ताणले तर तुटण्याची शक्यताच जास्त. दोधांनी आपल्या जिभेला आवर घालणे उत्तम. तरूणांनी जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी.

अनुकूल - ४, ८, २१, २६ प्रतिकूल - १३, २१


शनि - मंगळ षडाष्टक योग १-६ या स्थानातून होत असला तरी तुमच्या आर्थिक प्राप्तीवर त्याचा फार मोठा परिणाम होणार नाही. उलट तुमच्या धडाडीमुळे ती वाढतच रहाणार आहे. फक्त ती प्रत्यक्ष हातात पडण्यास थोडा वेळ विलंब होइल. निविदा संमत होण्यास ग्रह अनुकूल आहेत. कार्यालयात दबदबा कायम राहील. महिला मनमिळाऊ स्वभावामुळे वडीलधार्‍यांना प्रिय होतील. तरूणांना संगीत - गायनात प्रवीण असलेले स्थळ येईल.

अनुकूल - ५, ११, २३, २६ प्रतिकूल - ११, १८


मनावर नियंत्रण ठेवले नाही तर पैशाची अवास्तव मागणी करण्याची प्रवृत्ती वाढेल. मुलांच्या शिक्षणासाठी व नव्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पैशाची तरतूद करावी लागणार आहे याचे भान ठेवा. महिलांनी सुध्दा नवी खरेदी करतांना ती वस्तू घरात खरोखर आवश्यक आहे का याचा विचार करावा. कार्यालयात अधिकाराच्या कक्षा वाढतील. तरूणांना जिवलगाचे मन जिंकण्यासाठी भेटवस्तू द्यावी.

अनुकूल - ३, ८, १२, २५ प्रतिकूल - १४, २३


या सप्ताहात स्थावर इस्टेटीच्या वारसाहक्का संबंधातील काही प्रश्नांना सामोरे जावे लागेल. आवश्यक असलेल्या सरकारी दाखल्यांवर प्रामुख्याने आपले लख केद्रिंत करा. दाखल्यातील काही चुका कदाचित दुरूस्त कराव्या लागतील. तरूणांनी उच्च शिक्षणासाठी अँनिमेशन, मल्टिमिडीया किंवा वाहिन्यांची निर्मिती यांची निवड करावी. महिलांनी कुणावर टीका - टिपणी केल्यास नातेवाईकांतील परस्पर संबंध बिघडण्याची भीती आहे. तरूणांनी जोडीदाराची निवड करतांना आपल्या अंत:स्फूर्तीवर भर द्यावा.

अनुकूल - ५, ११, १९, २३ प्रतिकूल - १६, २६


कार्यालयात - व्यवसायात खूप मोठा पराक्रम गाजवावा असे कितीही वाटले तरी ते स्वप्न सहजासहजी पूर्ण होणार नाही. एक म्हणजे तुमच्या कार्यक्षमतेबद्दल वरिष्ठांना पुरेसा विश्वास वाटणार नाही. दुसरे म्हणजे तुमचे स्पर्धक व विरोधक कुटिल कारस्थाने करून त्यात आणखीनच भर टाकतील. महिलांनी केलेले खर्च वादाचा विषय ठरणार आहेत. तरूणांना आनंदी रसिक वृत्तीची स्थळे येतील.

अनुकूल - ४, १२, १६, २६ प्रतिकूल - १८, २८

 

समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली......!! हासत, नाचत, गात यावी दीपावली...!! उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,....!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे......!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्यायावे.......!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे........!! !! शुभ दीपावली ! फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली!

 

उत्तर प्रदेशाचे राज्यपाल मा.राम नाईक यांचे हस्ते Marathiworld.com चे ज्योतिषी एस.जी.अकोलकर यांचा सत्कार शिवजयंतीस करण्यात आला. त्यांच्या ३५ वर्षाच्या ज्योतिषसेवेचे महत्त्व जाणून  मुंबईतील जोगेश्वरी युवा प्रतिष्ठानने त्यात पुढाकार घेतला. श्री अकोलकर याचे योगदान असे :
 
मराठी  चित्रपट :
१) कलावंत विकणे आहे 
२) आपली माणसे 
३) श्रद्धा
 
टी.व्ही. मालिका :
१) बंदिनी(अधिकारी ब्रदर्स)
२) हाथकडी (मुंबई दूरदर्शन)
 
नाटक : 
१) चालविशी हाती 
२) तीन लाखावी गोष्ट (नाट्यसपंदा)
३) धुके न्हाऊन गेले  (महाराष्ट्र शासन पुरस्कार)
 
पटकथा : कुटुंब नियोजन (राष्ट्रीय पुरस्कार.)
टेलिफिल्म : तीस लाखांची गोष्ट. (E TV.)
YouTube : धन धना धन (पूर्ण नाटक)
 
दैनिक व मासिक : 
१) मुंबई सकाळ. (१२ वर्षे)
२) महाराष्ट्र टाईम्स
३) कृषीवल (कोकण)
४) बहुश्रुत
 
वार्षिक : 
१) महाराष्ट्र टाईम्स
२) गांवकरी ( नासिक)
३) रसरंग
 
इंटरनेट : www.marathiworld.com
 

 

श्री. एस. जी. अकोलकर, प्रसिध्द ज्योतिषी व चित्रपट कथा लेखक. हे ह्या क्षेत्रातील जवळपास ३० वर्षांहून अधिक अनुभवी आहेत. १२ वर्षे ते मुंबई सकाळ ह्या महाराष्ट्रातील अग्रमानांकित वृत्तपत्रात स्तंभलेखन करीत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख इ. च्या बाबतीत त्यांनी वर्तवलेली अनेक राजकीय भाकिते यशस्वी झाली आहेत. श्री. अकोलकर यांचा कृष्णमूर्ती पध्दतीचा (नक्षत्रांच्या गणितीवरून मांडलेले आडाखे/सिध्दांत) गाढा अभ्यास आहे.

व्यक्तिगत सल्ल्यासाठी संपर्काचा पत्ता -
श्री. एस जी अकोलकर
एस. जी. अकोलकर
६/४१० एम. एच. बी कॉलनी,
एल. टी. रोड, बोरीवली (पश्चिम)
मुंबई-४०००९१
संपर्क - ९८६९२२९८४४
ई-मेल - हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा. , हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

 
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF