आंबा-अननस-फणसाची भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - एक पिकलेला लहान अननस, पाव किलो अर्धवट पिकलेले गरे (मध्यम आकाराचा फणस), ५-६ रायवळ आंबे, १ वाटी ओले खोबरे, ८-१० काळया मिरीचे दाणे, अर्धा चमचा तिखट, पाव चमचा हळद, १ चमचा गूळ, मीठ चवीनुसार, फोडणीचे साहित्य, तेल.

कृती - फणसाच्या गर्‍यातील आठळया काढून गर्‍याचे प्रत्येकी चार तुकडे करावेत. अननसाची जाडसर साल, डोक्याकडील भाग व मधला दांडा काढून जरा मोठया फोडी कराव्यात, आंबे मऊ करून त्याचा रस कडावा. खोबरे, मिरे, हिंग, तिखट व हळद एकत्र करून जाडसर वाटून घ्यावेत. एका पातेल्यात तेल तापवून फोडणी करावी. त्यावर अननस, फणस व आंब्याचा रस घालावा. वाटलेले खोबरे, मीठ व गूळ घालून भाजी शिजू द्यावी. ही भाजी फार लवकर शिजते. मिश्र फळांच्या स्वादाने तिला वेगळीच चव येते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF