तांदुळक्याची भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - तांदुळका १ जुडी, कांदा १ मध्यम आकाराचा, लसूण ४-५ पाकळया, मीठ चवीपूरते, तेल २ चमचे, हिरव्या मिरच्या २, आमसूल २-३

कृती - प्रथम भाजी स्वच्छ निवडून घ्यावी. तिचा मुळाकडचा भाग घेऊ नये. वरवरची बोखं खुडून घ्यावीत. मग ती धुऊन चिरून घ्यावीत. एका कढईत तेल तापवून त्यात मिरची, हिंग, जिरे, हळदीची फोडणी करावी. नंतर त्यात कांदा लसूण टाकून परतावे. मग त्यात भाजी, मीठ, आमसुल टाकून वाफेवर शिजवून घ्यावी.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF