पडवळाची भाजी

भाज्या-तोंडीलावणी मुख्यपान

 

साहित्य - पडवळ पाव किलो, भिजवलेले मूग १ वाटी, हिरव्या मिरच्या १-२, धणे, जिरे पूड, आमचूर अर्धा चमचा, मीठ चवीपुरते

कृती - मूग ७-८ तास भिजवून ठेवावेत. नंतर ते चळणीवरून निथळून काढावेत. यात धणे,जिरे पूड, आमचूर, मीठ, वाटलेल्या मिरच्या सगळं एकत्र करावं. पडवळाचे गोल तुकडे करून आतील बिया काढून टाकाव्यात म्हणजे नळी तयार होईल. यात वरील मिश्रण भरावे. नंतर हे चाळणीवर ठेवून कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थोडया तेलाची हिंग, कडीपत्ता, मोहरी, हळद घालून फोडणी करावी. त्यावर हे उकडलेले तुकडे घालून परतावे नंतर त्यात मीठ, कोथिंबीर घालून एक वाफ काढावी व उतरावे. (ही भाजी अत्यंत पौष्टीक आणि पथ्यकर आहे. ह्दयासाठी पडवळ हे टॉनिक आहे)

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF