गुहा/लेंणी मुख्यपान

भाजे लेणी

भाजे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव विसापूर किल्ल्याजवळ वसलेले असून याच्या आसपास लेणी आढळतात. भारत सरकारने या लेण्यांना दिनांक २६ मे इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्टीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

यात सुमारे बावीस लेणी आढळतात.

लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे. उर्वरित एकवीस विहार दोन्ही बाजूंना पसरलेले आहेत. लेण्यांच्या मध्यभागी एक चैत्यगृह आहे. उर्वरित एकवीस दोन्ही बाजूना पसरलेले आहेत.

ही लेणी कलात्मकतेचा आविष्कार आहेत . येथे चैत्य गवाक्षांच्या माळा आहेत. त्यांना लागून कोरीव सज्जे बनवलेले आहेत. यातील काही सज्जांवर कोरीवकामातून जाळी आणि पडद्याचा भास निर्माण केलेला आहे. वेदिकापट्टी वासर नक्षीवर कोरीवकाम आहे. दगडात कोरून काढलेल्या कड्या आहेत. या ठिकाणी गवाक्षातून युगुले कोरेलेली दिसून येतात. तसेच येथे एक यक्षीणी कोरलेली आहे. या कमानीवर एकूण १७२ छिद्रे पाडलेली आहेत.

प्रवेशव्दार – चैत्यगृह १७.०८ मीटर लांब , ८.१३ मीटर रुंद आणि ७०३७ मीटर उंच असे आहे. त्यात सत्तावीस अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. या खांबावर कमळ, चक्र अशी चिन्हेही कोरलेली आहेत. एका ठिकाणी एक खुंटी आणि तिला अडकवलेला फुलांचा हार कोरलेला आहे.

चैत्यगृह – चैत्यगृहाला लाकडी तुळयांचे छत आहे. या तुळयांवर ब्राम्ही लिपीतील लेख आढळले आहेत. या चैत्यगृहाची निर्मिती इसवी सन पूर्व दुस-या शतकात भाजे लेणी कोरण्यास सुरुवात झाली असे मानले जाते. त्यानंतर आठशे वर्षे म्हणजेच इसवी सन सहाव्या शतकापर्यंत लेणी निर्मीतीची प्रक्रिया सुरु होती. येथील विहार दानातून उभे राहिलेले आहेत व त्यांच्याक दानाचे लेख तेथे दिसून येतात. चैत्यगृहाच्या दक्षिण दिशेस स्वच्छ पाण्याचा स्तोत्र आहे. भाजे लेणीचे दुमजली कोरीव काम केलेले आहे. येथील सूर्यलेणे प्रसिद्ध आहे. या लेण्यात पौराणिक प्रसंगाचे पट, सालंकृत-शस्त्रधारी द्वारपाल, वन्यप्राण्यांचे थर आणि चैत्य-स्तूपाचे नक्षीकाम कोरलेले आहे. यात सूर्य आणि इंद्राचा मानला जाणारा देखावा आहे. कोरीव कामाचा उत्कृष्ट नमुना असणारी ही लेणी महाराष्ट्राची शान आहेत.


Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा