डोरा द एक्सप्लोर्र
डोरा द एक्सप्लोर्र हे निक चॅनलवरचे बालवाडीतल्या मुलांसाठीचे लोकप्रिय तसेच शैक्षणिक कार्टून. अमेरिकेत प्रथम प्रसारित झालेले हे कार्टून नंतर सा-या जगभरात दाखवले गेले. डोराचे निर्माते आहेत क्रिस गिर्फोड, वॅलरी वॉल्श आणि एरिक वीनर. डोरा लवकरच अत्यंत लोकप्रिय झाले आणि अवघ्या काही दिवसात $3 अब्ज डॉलरचा व्यवसाय केला. स्पॅनिश मध्ये ' एक्सप्लोराडोरा ' चा अर्थ ' फिमेल एक्सप्लोर्र ' म्हणजे स्त्री संशोधक. ह्या शब्दावरुनच कार्टूनला नाव डोरा देण्यात आले. प्रत्येक भागात डोरा काहीतरी नवीन शोधात असते किंवा कोणाला मदत तरी करत असते. सर्वात प्रथम, मोहिमेवर जाण्याआधी ती आवश्यक वस्तू शोधते आणि प्रत्येक काम तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करते. प्रत्येक वेळेला ती प्रेक्षकांना म्हणजेच बालदोस्तांना अनेक प्रश्न विचारते, त्यांची मदत मागते त्यामुळे बच्चे कंपनी अगदी तल्लीन होऊन हा कार्यक्रम बघतात. डोराचा बेस्ट फ्रेंड आहे बुट्स माकड. त्या दोघांना बेसबॉल आणि सॉकर खेळायला खुप आवडते. डोरा बरोबर असतात तिचे आई-बाबा, आजी, आणि भावंड. ह्या कार्टून मधली महत्त्वाची पात्र आहेत बुट्स, डिगो, स्वायपर( कोल्हा). डोराच्या सर्व भागात निसर्ग, भाषा, गणित तुम्हाला शिकता येते. तर मग डोराचा एकही एपिसोड चुकवत जाऊ नका. डोराची वेबसाईट आहे - http://www.nickjr.com/shows/dora/index.jhtml
है बडा प्यारा डोरेमॉन
हंगामा चॅनलवर लोकप्रिय असणारा डोरेमॉन नोबेता बरोबर तुमचाही लाडका आहे नां ? नोबेता कोण ? अहो, नोबी नोबेता हा आळशी, ढेपाळलेला आणि ( त्याच्या म्हण्यानुसार ) कमनशिबी मुलगा आहे. डोरेमॉन हा रोबोट मांजर नोबेताला कायम मदत करतो. डोरेमॉनकडे अनेक प्रकारची गॅजेट असतात ज्याने तो नोबेताला शाळेत, मित्रांमध्ये, बागेत अगदी वाटेल तिथे मदत करत असतो. कधी तर माहिती आहे तो नोबेताला स्पेसशीप असणारया भविष्यात घेऊन जातो तर कधी डायनासोर असणारया भूतकाळात ! पण डोरेमॉनला सुध्दा कधीकधी काही गोष्टी जमत नाहीत त्यावेळेला नोबेता त्याला मदत करतो. मूळचे जपानचे असणारे हे कार्टून आता भारतातील मुलांनाही आवडायला लागले आहे. हंगामा चॅनलवर डोरेमॉनची 'मायक्रो' साईट आहे. http://www.thoiaotrang.com/kids/doremon.html ही तर जपानी भाषेतली साईट आहे. वाचता येतेय का बघा.
|
|

|
|
|