बालनगरी - गुदगुल्या

बालनगरी मुख्यपान

 

शिक्षक : आफ्रिकेत आढळणार्‍या एका प्राण्याचे नाव सांग?
विद्यार्थी : वाघ
शिक्षक : खूपच छान. आता दुसरा एखादा प्राणी सांग?
विद्यार्थी : दुसरा वाघ


शिक्षक : बादशहा अकबरने कुठपर्यंत राज्य केलं?
विद्यार्थी : पान नंबर १४ ते पान नंबर २५

वडील (मुलाला) : तू मघापासून कोंबडा का झाला आहेस?
मुलगा : बाबा तुम्हीच तर म्हणाला होतात की जे काम शाळेत करशील ते घरात अर्धा तास करत जा.

शिक्षक : तुला एखाद्या प्रसिध्द लढाईची माहिती आहे का?
विद्यार्थी : होय सर
शिक्षक : सांग बरं
विद्यार्थी : आईने घरातल्या गोष्टी बाहेर सांगायला बंदी घातली आहे.

विक्की : बाबा, पटकन् मला दहा रूपये द्या.
गल्लीत एक गरीब माणूस केव्हापासून ओरडतोय.
बाबा : तो काय म्हणतोय?
विक्की : आई...स्क्रीम ......... आई...स्क्रीम

प्रेषक
मानसी खानझोडे

बालमित्रांनो, तुम्हीही तुमच्या माहितीतले चुटकुले/किस्से/जोक्स आमच्याकडे पाठवा. सार्‍यांसाठी ते प्रसिध्द करूयात. सारेच जण मज्जा लुटुयात!

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा