अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

मधल्या वेळचे पदार्थ

 


 

व्यवस्थित न्याहारी घेणे ही खास पाश्चात्य संस्कृतीतील प्रथा आहे. 'ग्रेकफास्ट' या शब्दाचा अर्थच उपवास सोडणे असा होतो. सकाळी उठल्यावर रक्तातील उत्साहवर्धक तत्वे अत्यंत कमी झालेली असतात.त्यामूळे नव्या दिवसाच्या कामाला हात घालण्यापूर्वी ती वृध्दिंगत करणे जरूर असते. शरीराची ही गरज ओळखून पाश्चात्य देशात न्याहारीसाठी सहज पचतील, परंतु अत्यंत पौष्टिक असतील असेच पदार्थ सेवन केले जातात. शरीराची ही गरज केवळ शारिरीक श्रम करणार्‍यांसाठीच सीमित नसून बौध्दिक काम करणार्‍यांनाही लागू आहे.

भारतातही न्याहारी केली जाते. न्याहारीसाठी पूर्वीपासून चालत आलेला पदार्थ म्हणजे आदल्या दिवशीची शिळी भाकरी, ती कुस्करून त्यात दूध-मीठ घालून लसूण चटणी किंवा लिबांचे/कैरीचे लोणचे ही महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची खरी न्याहारी. कोकण भागात गुरगुटया भात व मेतकूट किंवा तांदळाची उकड तिखट मीठाचा सांजा हे पदार्थ केले जातात. तसेच संध्याकाळच्यावेळी दोन मुख्य जेवणातील अल्प आहार म्हणून 'मधल्या वेळेच्या खाण्याचे' पदार्थ लोकप्रिय आहेत. एकाचवेळी खूप जेवणापेक्षा थोडया थोडया वेळाने थोडे थोडे खाणे प्रकृतीच्या दृष्टीनेही चांगलेच असते. न्याहारी व मधल्यावेळच्या खाण्यासाठी महाराष्ट्रात बनविल्या जाणार्‍या काही निवडक पदार्थ याठिकाणी दिले आहेत, जे अबालवृध्दांपासून सर्वांनाच आवडतील अशी आशा आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF