अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

पोळी-भाकरी

 


 

भारतात उत्तरेकडे गहू जास्त व चांगला पिकत असल्यामुळे तिकडच्या जेवणात पोळी (रोटी) हे मुख्य अन्न तर दक्षिण भारतात तांदुळाचे उत्पन्न जास्त म्हणून मुख्य अन्न भात. महाराष्ट्रात मात्र, कोकणचा भाग वगळल्यास, भात आणि पोळी या दोन्हींना जेवणात समान स्थान आहे. 'पोळी-भाजी-भात-आमटी' हा महाराष्ट्रीयांचा 'चौरस' आहार. विशेषत: शेतकरी वर्गाचे भाकरी हेच मुख्य अन्न आहे. गव्हाची मऊसूत पोळी,किंवा गरम-गरम फुलके हे रोजच्या जेवणातील , पुरी ही सणावारी किंवा अन्नपालट म्हणून आणि खास सणानिमित्ताने पुरणपोळी, गूळपोळी, खव्याची पोळी, उसाच्या रसाची पोळी, आंबरसाबरोबर खाण्यासाठी केलेली तांदुळाच्या उकडीची पोळी, पेढयाची पोळी हे पोळीचे महाराष्ट्रात प्रचलित असलेले व सुप्रसिध्द प्रकार. ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची गरम भाकरी आणि त्यावर घरगुती लोण्याचा गोळा, झुणका-भाकरी, संक्रांतीच्या वेळी तीळ लावून केलेली भाकरी, लसूणचटणी आणि भाकरी हे मराठमोळया माणसांच्या जिभेला खवळायला लावणारे पदार्थ. हे चविष्ट आणि पोटभरीचे पदार्थ बनवायचे तरी कसे? त्यासाठीच पुढे दिलेल्या आहेत त्यांच्या पाककृती.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF