अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

दिवाळीचा फराळ

 


 

सणांचा राजा म्हणून दिवाळीला मान आहे. वसुबारसेला सुरू होणारा हा सण भाऊबीजेपर्यंत विविध प्रकारे साजरा केला जातो. त्यातील दिवाळीच्या फराळाला महाराष्ट्रीय लोकांच्या मनात वेगळेच स्थान आहे. भल्या पहाटे अभ्यंगस्नान करून, देवदर्शन घेऊन, घरी बनविलेल्या फराळाच्या पदार्थांचा समाचार घेऊन दिवाळीची सुरुवात होते. पूर्वी दिवाळीच्या फराळाचे जिन्नस वर्षातून एकदा- फक्त दिवाळीलाच केले जात असत. त्यामुळे लाडू, करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसे, चिवडा, साटोऱ्या, मोतीचूर, चिरोटे वगैरे पदार्थांचे सर्वांना कमालीचे अप्रूप असे. आज हे पदार्थ अनेक उपाहारगृहांमधून वर्षभर नियमितपणे मिळतात. तरीही या पदार्थांच्या तळणीचा वास आल्याशिवाय दिवाळी साजरी केल्याचे समाधान मिळत नाही. खुसखुशीत व तोंडात घातल्या घातल्या विरघळणारी चकली हा अनेक गृहिणींचा कौतुकाचा विषय आहे कारण सगळयांना ती जमतेच असे नाही. हे फराळाचे पदार्थ करण्याच्या 'हमखास छान उतरणाऱ्या' पाककृती पुढे दिलेल्या आहेत. त्या तुम्हाला रुचतील अशी आशा आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF