अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

केकच्या विविध कृती

 


 

प्रत्येक वेळी केक बनवताना, पुढील सल्ले व सूचना ध्यानात घ्या.

१. अंडी फेसायची भांडी स्वच्छ असायला हवीत. ही भांडी हिंडालियम किंवा जर्मन धातुची असल्यास श्रेयस्कर. असे केल्याने केकमध्ये कचकच लागत नाही.

२. मैदा व बेकिंग पावडर एकजीव करावी. हे एकत्र केलेले मिश्रण ३ वेळा चाळल्यास केक मऊ व स्पंजप्रमाणे लुसलुशीत होतो.

३. अंडयाचा पांढरा व पिवळा बलक वेगवेगळा फेसावा. असे कल्याने केक अधिक मऊ होतो. व फेटायला वेळ कमी लागतो. त्यातही पांढरा बलक आधी व मग पिवळा बलक फेटावा.

४. केकमधे रंग घालायचा असल्यास त्यात दूध घालू नये. कारण त्यामुळे रंग बदलतो.

५. केक भाजण्यासाठी वापराल ते केकपात्र ऍल्यूमिनियमचे असावे. कारण त्यामुळे केक लवकर 'बेक' होतो, तसेच जास्त मऊ देखील होतो.

६. मोठा केक (120 ग्रॅम्स व त्यापेक्षा जास्त वजनाचा) पाऊण तासात होतो, तर लहान केक (१०० ग्रॅम्स साहित्याचा) ओव्हनमधे केल्यास २० मिनिटांत तयार होतो.

७. ऍल्यूमिनियमच्या केकपात्रातून चारही बाजूने केक सुटला आणि वरच्या अंगाने त्याला रंग आला (ब्राऊनीश कलर) की सुरी किंवा विणायची सुई केकच्या मध्यभागी खुपसून पाहावी. सुईला/सुरीला मिश्रण चिकटून आले नाही तर समजावे की केक अगदी तयार झाला आहे.

८. केक भाजून झाल्यानंतर बंद ओहनमध्ये तो न ठेवता थोडा कोमट असतानाच ताटामध्ये किंवा चाळणीवर काढावा. तसे न केल्यास केक केकपात्रालाच चिकटून राहतो व निघत नाही.

९. मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मॉडेल असल्यास केक लवकर तयार होतो, फक्त मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मॉडेल मध्ये केक चांगला होतो. साध्या मायक्रोवेव्हमध्ये केक फक्त शिजतो, बेक होत नाही. केक चांगला होण्याकरिता ओव्हन १५-२० मिनीटे तापवून घेणे आवश्यक आहे.


सीमा कुलकर्णी हया बेकिंग व कुकिंग कौशल्यामधे पारंगत आहेत. पाक-कलेचे क्लासेस घेणे, मुलांकरिता शिबिरे भरविणे, असे उपक्रम त्या करतात. त्यांनी बालवाडी-प्रशिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून, 'आर्ट ऑफ लिव्हिंग' हया अध्यात्मिक चळवळीच्या त्या सदस्य आहेत.
सीमा कुलकर्णी
Share
 
Joomla SEO powered by JoomSEF