अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

भाज्या-तोंडीलावणी

 


आपल्या आहारातील भाज्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे क्षार व जीवनसत्वांचा पुरवठा करणे हे होय. म्हणूनच भाज्यांना आहारात फार महत्वाचे स्थान आहे. क्षार व जीवनसत्वांचे प्रमाण ताज्या भाज्यांमध्ये जास्त आढळून येते. ह्याशिवाय भाज्यांमघ्ये एक तंतुमय भाग आहे. आहारघटक म्हणून ह्याचा काहीही उपयोग होत नाही. परंतु मोठे आतडे स्वच्छ राहण्यासाठी व आतील मळ पुढे ढकलण्यासाठी व शरीराबाहेर टाकण्यासाठी या तंतुमय भागाचा फार उपयोग होतो. पालेभाज्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम, लोह (आयर्न) व जीवनसत्व 'अ' आणि 'क' असते. कंदमुळात पिष्टमय घटकांचे प्रमाण जास्त असते. गाजरात 'अ' जीवनसत्व असते. साली सकट बटाटे वापरल्यास 'क' जीवनसत्व मिळते. आहारात आम्ल व अल्कली यांचे योग्य प्रमाण असणे जरूरीचे आहे. मांस, मासे, अंडी, सर्व धान्ये यात आम्ल असते. दूध, नाचणी, भाज्या व फळे ही अल्कली आहेत. कोबी, मटार, फरसबी, गाजर, लिंबू, बटाटा व मुळे ह्या भाज्यांमध्ये अल्कलीचे प्रमाण जास्त आहे. या विविध भाज्यांच्या महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या खास कृती येथे दिलेल्या आहेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF