अन्न हे पूर्णब्रम्ह मुख्यपान

 

मासांहारी पदार्थ

 


 

भारतीय लोक जास्त करून शाकाहारी आहेत. असे असले तरीही भारतातील प्रत्येक राज्यात, मांसाहारी पदार्थ हे जेवणाचा अविभाज्य भाग असलेले अनेक लोक आहेत. भारतीय मसाल्याचे पदार्थ वापरून केलेले सामिष भोजन हे परकीयांनासुध्दा हल्ली आवडू लागले आहे. या आहारापासून शरीराला मुख्यत: जास्त प्रथिने (प्रोटिन्स) मिळत असल्यामुळेही हे पदार्थ खाल्ले जातात. पार्टी हवी तर 'ओली' व कोंबडीची अशी तरूणवर्गाची मागणी असते. समुद्रकिनारी रहाणा-यांकडे माशाचे पदार्थ आवडीने खाल्ले जातात. महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शहर झणझणीत मटणासाठी , तर अलिबाग,रत्नांगिरी हे माशांसाठी प्रसिध्द आहेत. गावोगावच्या जत्रेत काही गावदेवतांना मांसाहारी पदार्थच नैवेद्याला लागतात. कोकणकडील भागात नारळाचे वाटण वापरून हे पदार्थ बनविले जातात. खास मराठी ढंगाचे मांसाहारी पदार्थ या विभागात दिलेले आहेत. ते आपल्याला खचितच आवडतील.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF