मुगाची खिचडी

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य - दीड वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, चवीनुसार लालतिखट-मीठ, एक ते दीड चहाचा चमचा काळा मसाला, ३-४ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, १ चहाचा चमचा जिरे, थोडे सुके खोबरे, १ चमचा दही, थोडे ओले खोबरे व मुठभर धुवून चिरलेली कोथिंबीर, फोडणीसाठी १ डाव गोडेतेल, चहाचा एक चमचा प्रत्येकी हिंग, हळद, मोहरी वरून वाढण्यासाठी साजूक तूप.

कृती - डाळ व तांदूळ एकत्र करून स्वच्छ धुवून घ्यावेत. एका पातेल्यात तेलाची हिंग, हळद, मोहरी घालून फोडणी करावी. त्यात धुतलेले डाळ व तांदूळ घालून जरा परतावे. नंतर त्यात चार वाटया गरम पाणी, मीठ, तिखट, काळा मसाला घालावा. लवंग, दालचिनी, जिरे, सुके खोबरे वाटून घ्यावे व ते खिचडीत घालावे. थोडया वेळाने खिचडी ढवळून झाकण घलावे मंदाग्नीवर खिचडी शिजू द्यावी. खिचडी वाढताना वरून ओले खोबरे कोथिंबीर व साजूक तूप घालून द्यावे.

टीप - मुगाची खिचडी तळलेला उडीद किंवा पोह्याचा पापड, ताकाची कढी व आंब्याचे लोणचे याबरोबर खाण्याची पध्दत आहे.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा