मसूर पुलाव

भाताचे प्रकार मुख्यपान

 

साहित्य : अर्धी वाटी अख्खे मसूर, एक वाटी बासमती तांदूळ, मसाला वेलची, दोन लवंग, अर्धा चमचा धने पावडर, अर्धे तमाल पत्र, एक मोठा चमचा साजूक तूप

कृती : मसूर ४-५ भिजवा. तीन शिट्ट्या करून कमी पाणी घालून बासमती तांदूळ कुकरमध्ये शिजवून घ्या. थंड झाल्यावर ताटलीत पसरुन ठेवा. कढईत एक चमचा साजूक तूप घालून मसाला वेलची, लवंग, तमालपत्र,धने पावडर घालून व भिजवलेले मसूर झाकण ठेवून वाफ आणा. मसूर शिजले की मोकळा बासमती भात मिसळा, चवीपुरते एक चमचा मीठ घाला व झाकण ठेवून वाफ येऊ द्या. आवडत्या रायत्याबरोबर सर्व्ह करा.

बासमती वायू कारक असल्याने पचण्यास जड असतो. मसूर डाळ पचण्यास हलकी असते.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF

 
सेवासुविधा