दिवाळीचा फराळ मुख्यपान

 

शेव

 

साहित्य - १ वाटी तेल, ४ चमचे तिखट, ४ चमचे मीठ, पाव चमचा हळद, १ चमचा ओवापूड(ऐच्छिक), अंदाजे ४ वाटया डाळीचे पीठ, तळण्याकरता तेल.

कृती - १ वाटी तेल, १ वाटी पाणी घालून हाताने परातीत फेसावे किंवा एग बिटरने एकजीव करावे. पांढरट रंगाचे होईपर्यंत फेसावे. त्या तेलात १ चमचा ओवापूड, मीठ, तिखट, हळद घालावी व सामावेल तेवढे डाळीचे पीठ घालावे. खूप घट्ट भिजवायचे नाही. भाज्यांच्या पिठापेक्षा घट्ट असावे. पसरट कढईत तेल तापवावे. वरील तयार पीठ सोर्‍यात मावेल एवढे भरावे. सोर्‍याला कढईतल्या तेलावर धरून हाताने गोल फिरवत सोर्‍या दाबून कढईत शेवेचा गोल चवंगा पाडावा. थोडया वेळाने दूसर्‍या बाजूनी हलक्या हाताने उलगडून चवंगा दोन्ही बाजूनी हलक्या गुलाबी रंगावर तळावा व चाळणीत तेलातून निथळून काढावा. अशा रितीने सर्व पिठाचे चवंगे घालून शेव तळून घ्यावी. अंदाजे ७-८ चवंगे होतील व शेव वजनाला अर्ध्या किलोपेक्षा जास्त भरेल.

 
 

चिवडा

 

साहित्य - भाजके पोहे मापी असतील तर १ माप, वजनी असेल तर पाव किलो, दाणे १०० ग्रॅम, खोबरे पातळ काप करून, १०० ग्रॅम डाळं, १०-१२ मिरच्या, १ इंच आलं, १०-१२ लसूण पाकळया वाटून, पाव किलो गोडेतेल, मीठ, तांबडे तिखट, धन्याजिर्‍याची पूड, १ चहाचा चमचा पिठीसाखर, मूठभर कढीलिंबाची पाने, फोडणीचे साहित्य.

कृती - भाजके पोहे मोठया भोकाच्या चाळणीने चाळून स्वच्छ निवडावेत. कारण भाजक्या पोह्यात वाळू किंवा कचकच जास्त असते. पोहे कडकडीत उन्हात वाळत टाकावेत. मोठया पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी करावी, त्यात कढीलिंबाची पाने, वाटलेल्या मिरच्या, आलं जरा परतावे

 
 

शंकरपाळे

 

साहित्य - १ वाटी रवा, १ वाटी साखर, १ वाटी पाणी व अर्धा वाटी तूप, मैदा

कृती - प्रथम १ वाटी साखर, १ वाटी पाणी व अर्धा वाटी तूप एकत्र करून साखर विरघळेपर्यंत गॅसवर ठेवावे. नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्यात रवा मिसळावा. गरम असताना रवा मिसळल्यास तो शिजतो. रवा मिसळल्यानंतर दीड ते दोन तास भिजू द्यावे. नंतर त्यात मावेल तितका मैदा घालून व्यवस्थित(खूप घट्ट नाही व खूप पातळ ही नाही.) मळावे. नंतर त्या पिठाचा लहानसा गोळा घेऊन पोळपाटावर लाटावा. नंतर कातण्याने त्याचे शंकरपाळे कापून तुपात मंदाग्नीवर कापून तुपात मंदाग्नीवर तळावेत.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF