दिवाळीचा फराळ मुख्यपान

रव्याचे लाडू


साहित्य - २ फुलपात्रे रवा, दीड फुलपात्रे साखर, १ मध्यम नारळ, ७-८ वेलदोडयाची पूड, थोडे काजूचे तुकडे, २५ ग्रॅम बेदाणा.

कृती - प्रथम रवा भाजून घ्यावा, रवा भाजत आला की त्यात खोबरे घालून जरा परतावे. साखरेत अर्धे फुलपात्रे पाणी घालून दोन तारी पाक झाला, की त्यात भाजलेला रवा घालून उतरवावे. मिश्रण चांगले ढवळावे. नंतर त्यात वेलदोडयाची पूड, काजूचे तुकडे, बेदाणा घालावा. २-३ तासाने मिश्रण  सुकत आले की लाडू वळावेत.

रवा-बेसन लाडू


साहित्य - ३ फुलपात्रे हरभर्‍याच्या डाळीचा रवा, २ फुलपात्रे गव्हाचा रवा, ४ फुलपात्रे १/४ किलो किलो केशरी पेढे (जरा कोरडे), १५-२० वेलदोडयांची पूड, ५० ग्रॅम बेदाणा, २५ ग्रॅम काजूचे काप, थोडेसे केशर

कृती - जरा जास्त तुपावर डाळीचा रवा भाजून घ्यावा. खमंग वास आला की उतरवून पितळेच्या चाळणीवर ओतावा. खाली पडलेल्या तुपावर साधा रवा भाजून घ्यावा. साखरेत १ फुलपात्र पाणी घालून पाक करायला ठेवावा. २ तारी व जरा चिकट पाक करावा, नंतर त्यात कुस्करलेले पेढे, वेलदोडयांची पूड, बेदाणा, काजूचे काप केशराची पूड घालावी. सर्व मिश्रण ढवळून घ्यावे. साधारणपणे तासाभराने लाडू वळावेत. चवीला सुंदर लागतात.

Share
 
Joomla SEO powered by JoomSEF