कोकोनट केक
साहित्य - लोणी किंवा मार्गरिन २५० ग्रॅम, मैदा ५०० ग्रॅम, बेकींग पावडर १ टेस्पून, ब्राऊन शुगर २५० ग्रॅम, खोब-याचा बारीक कीस २०० ग्रॅम, अंडी २, गोड ताक किंवा दूध १/२ कप.
कृती -
१) ओव्हन चालू करून १८० अंशावर तापवावा.
२) मैदा व बेकिंग पावडर एकत्र करून चाळून झाकून ठेवावे.
३) मार्गरिन किंवा लोण्याचे तुकडे करून ते मैद्यात मिसळावे. मिसळताना फक्त बोटांची टोकेच वापरावी. मिसळून झाल्यावर ब्रेडच्या भुग्याप्रमाणे दिसले पाहिजे.
४) त्यात हलक्या हाताने साखर व खोबरे मिसळावे.
५) अंडी फोडून घुसळून त्यात मिसळावी.
६) त्यात ताक किंवा दूध घालून सारखे करावे.
७) केकच्या टीनला तळाला व बाजूला लोणी लावून त्यात मध्यभागी बटरपेपरचा तुकडा लावावा.त्यावर थोडा मैदा भुरभुरावा. मैदा टीनला सर्व बाजूनी लागला पाहिजे.
८) तयार मिश्रण टीनमध्ये घालून तापवून घेतलेल्या ओव्हनमध्ये १८-२० मिनीटे भाजावे.
९) केकच्या मध्यभागी सुरी घालून केक तयार झाला आहे का ते पहावे. केकचे मिश्रण सुरीला न चिकटल्यास केक तयार झाला असे समजावे.
१०) केक जाळीवर काढून थंड होऊ द्यावा.
आदिती पातकर